Join us

Diwali Tips: १ रुपयात पंखा साफ करण्याचा देसी जुगाड, कमी कष्टात दिसेल नव्यासारखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:26 IST

Diwali Tips: दिवाळीची साफसफाई सुरु होते पंखे पुसण्यापासून, हे किचकट काम सोपं करण्यासाठी १ रुपयाची ट्रिक नक्की वापरून बघा. 

दिवाळीची(Diwali 2025) साफसफाई म्हटलं की सगळ्यात मोठं आव्हान असतं ते छतावरील (Ceiling) पंखा स्वच्छ करणे. धुळीची पुटं चढून तेलकट, चिकट झालेले पंखे स्वच्छ करणं म्हणजे महा किचकट काम, मात्र ते करावे तर लागणारच! नाही केले तर घराची शोभा जाणार. यावर उपाय म्हणून एक देसी जुगाड जाणून घेऊ, ज्यामुळे हे काम १ रुपयात आणि १ मिनिटात होईल. 

यूट्यूब स्टार शोभा बैंसला यांनी एक असा सोपा 'देसी जुगाड' (देसी हॅक) सांगितला आहे, ज्यामुळे तुम्हाला शिडी किंवा स्टूलची गरज पडणार नाही आणि तुमचा पंखा केवळ ₹१ च्या खर्चात अगदी कमी वेळात नव्यासारखा चमकेल.

शिडी, स्टूल न वापरता पंखा स्वच्छ करण्याची सोपी पद्धत (How To Clean Ceiling Fan (Diwali Cleaning Tips) 

१. पहिले काम: धुळीचा जाड थर दूर करा

पंख्याची सफाई सुरू करण्यापूर्वी त्यावर साचलेली धूळ आणि जळमट झाडूच्या मदतीने झाडून काढा. झाडूची लांब दांडी पंख्यापर्यंत सहज पोहोचते, त्यामुळे शिडीवर चढण्याची गरज पडत नाही. यामुळे पुढची सफाई करणे सोपे होते.

२. 'होममेड' क्लिनर (Home-made Cleaner)

पंख्यावरील तेलकट आणि चिकट घाण काढण्यासाठी हा ₹१ चा उपाय वापरा. 

घटक: एका गरम भांड्यात ॲन्टासिड पावडरचे (इनो) एक पाकीट आणि एक रुपयाच्या शॅम्पूचे पाऊच टाकून ते चांगले मिक्स करा.

लाभ: ॲन्टासिड पावडरमधील सायट्रिक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेट शॅम्पूच्या डिटर्जंट गुणांसोबत मिसळून फेस तयार करतात.

हा फेस केलेले मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. ते मिश्रण पंख्यावर स्प्रे करा. 

३. सफाईसाठी खास 'टूल' (Tool)

पंख्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचण्यासाठी आणि घासण्यासाठी एक सोपे टूल तयार करा. 

त्यासाठी एक हँडल असलेला स्क्रबर घ्या. एका प्लास्टिकच्या बाटलीचा झाकणाचा भाग कापून घ्या.

कापलेल्या भागामध्ये दोन छिद्रे करा आणि तारेच्या मदतीने स्क्रबरच्या हँडलवर घट्ट बांधून घ्या. बाटलीचे झाकण लावायचा भाग वरच्या बाजूला ठेवा.

आता या झाकणाच्या भागात एक लांब पाईप किंवा झाडूची दांडी फिक्स करा. हे घरगुती टूल शिडीशिवाय पंख्याला घासण्यासाठी एकदम तयार होईल.

स्वच्छता करण्याची सोपी पद्धत

१.  स्प्रे करा: सर्वात आधी पंख्याच्या ब्लेडवर तयार केलेल्या मिश्रणाचा फवारा करा आणि मातीचा थर दूर होण्यासाठी तो भाग थोडावेळ तसाच ओलसर राहू द्या. 

२.  घासा: आता लांब दांडीमध्ये फिक्स केलेल्या स्क्रबरचा उपयोग करून पंख्याच्या पाती हळू हळू घासा. लांब हँडलमुळे तुम्ही जमिनीवर उभे राहूनच पंख्याचा मधला भागही सहज साफ करू शकता.

३.  पुसून काढा: सफाई पूर्ण झाल्यावर पंख्याला चमकदार आणि डागरहित करण्यासाठी पुसणे आवश्यक आहे. त्यासाठी याच स्क्रबर टूलवर एक स्वच्छ आणि सुका कपडा घट्ट बसवा. या कपड्याच्या मदतीने पंख्याची पात हळू हळू पुसून घ्या.

हा देसी जुगाड वापरल्यास तुमचा पंखा अगदी नव्यासारखा चमकेल आणि दिवाळीच्या स्वच्छतेचे एक मोठे काम कमी वेळात आणि कमी खर्चात पूर्ण होईल!

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Cleaning Hack: Clean Ceiling Fan for ₹1, Effortlessly!

Web Summary : Clean ceiling fans easily this Diwali with a ₹1 homemade cleaner and tool. Use a simple DIY method with ingredients like antacid powder and shampoo, plus a clever scrubber tool, to remove grime quickly and efficiently without needing a ladder.
टॅग्स :दिवाळी २०२५गृह सजावटकिचन टिप्ससोशल व्हायरलभारतीय उत्सव-सण