बॉलिवूडमधील तारे तारकांची लग्न म्हणजे एक शाही सोहळाच असतो. या सोहळ्याचे सगळे अपडेट घेण्यासाठी त्यांचे चाहते अतिशय उत्सुक असतात. दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील अनेकांचे आवडते कपल आहे. २०१८ मध्ये दीपवीर यांनी लग्नगाठ बांधत आपले नाते अधिकृत केले. या दोघांमधले बाँडींग आणि प्रेम अनेकदा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या दोघांच्या लग्नाचे सगळेच सोहळे, त्यांचे कपडे, लग्नातील पदार्थ या सगळ्याचीच जोरदार चर्चा झाली होती. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्यासोबतचा दिपीकाचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. २०१९ मध्ये बिझनेस ऑफ फॅशनला दिलेली ही मुलाखत असल्याचे समजते (Deepika padukon Ranveer Singh Wedding Menu Testing).
अभिनेते आणि अभिनेत्री म्हटल्यावर त्यांच्या लग्नाचा थाटमाटही खूप मोठा असतो हे आपण पाहतो. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्थाही अतिशय चोख ठेवली जाते. पाहुण्यांची येण्या जाण्याची, राहण्याची, त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेत तसूभरही कमी ठेवून चालत नाही. इतकेच नाही तर या ग्रँड लग्नाचे मेन्यूही अतिशय शाही असतात. असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ याठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवले जातात. दीपवीरच्या लग्नात होते तसे जेवण आपण कधीच घेतले नाही असे सब्यसाची म्हणतात.