वडील आणि मुलीचं नातं हे जगावेगळंच असतं. याच कारणामुळे मुलींना पापा की परी असं म्हटलं जातं. सोशल मीडियावर एका वडीलांचा आणि त्याच्या दोन छोट्या मुलींचा एक क्यूट व्हिडीओ व्हायरल होत आहे (Viral Video). या व्हिडिओमध्ये मुलींनी पहिल्यांदा साडी नेसल्यानंतर वडीलांनी कशी रिएक्शन दिली हे क्षण कॅमेरात टिपण्यात आले आहेत. (Daughters Wear Saree First Time Father Reaction Goes Viral Video Will Make You Emotional)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक वडील बाल्कनीत उभे राहून फोनवर बोलत आहेत. त्याचवेळी त्यांच्या दोन्ही मुली रूममध्ये प्रवेश करतात. यात दोन्ही मुलींनी महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला आहे. यात दोन्ही मुली वडीलांजवळ जातात मग वडीलांचं लक्ष त्या दोघींच्या गेटअपकडे जातं.
बाल्कनीत विष्ठेचा वास येतो-कबुतरांनी उच्छाद मांडलाय? 5 उपाय, एकही कबुतर घाण करणार नाही
नंतर या दोघींचे वडील फोन ठेवून त्या दोघींकडे पाहतात नंतर त्यांना जवळ घेऊन प्रेमानं चुंबन घेतात. या व्हिडिओतील बाप लेकीचं प्रेम पाहून लोक इमोशनल झाले आहेत.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की जेव्हा वडील आपल्या मुलींना पहिल्यांदा साडीमध्ये पाहतात...
पोट-कंबरेची चरबी वाढलीये? १ चमचा मेथीच्या दाण्यांचा सोपा उपाय, मेणासारखी वितळेल चरबी
सोशल मीडिया युजरर्सनी हा व्हिडिओ क्यूट असल्याचं सांगितलं आहे.आत्तापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी या व्हिडिओवर रिएक्शन्ससुद्धा दिले आहे. दोन्ही परी खूप सुंदर दिसत आहेत अशी कमेंट एका युजरनं केली आहे. व्हिडिओमधील व्यक्ती खूपच भाग्यवान आहे अशी कमेंट एकानं केली आहे. एका युजरला हा व्हिडिओ पाहून आपल्या मुलीच्या पाठवणीचे क्षण आठवले.