Lokmat Sakhi >Social Viral > घरात फार झुरळं झाली आहेत? नको नको विषारी स्प्रे, करा हे '६' उपाय झटपट

घरात फार झुरळं झाली आहेत? नको नको विषारी स्प्रे, करा हे '६' उपाय झटपट

Cockroaches In The House? Try These '6' Remedies : घरात झुरळं वाढली आहेत. हे उपाय करुन बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2025 17:07 IST2025-02-05T17:04:22+5:302025-02-05T17:07:12+5:30

Cockroaches In The House? Try These '6' Remedies : घरात झुरळं वाढली आहेत. हे उपाय करुन बघा.

Cockroaches In The House? Try These '6' Remedies | घरात फार झुरळं झाली आहेत? नको नको विषारी स्प्रे, करा हे '६' उपाय झटपट

घरात फार झुरळं झाली आहेत? नको नको विषारी स्प्रे, करा हे '६' उपाय झटपट

घरात झुरळं दिसलं की, जीव अगदी टांगणीला लागतो. कधी एकदाचं त्याला घराबाहेर काढतेय असं होतं. कारण एक झुरळ दिसलं म्हणजे अजून असणारंच. ते एकटं थोडीच घरात येऊन राहतं. (Cockroaches In The House? Try These '6' Remedies)सह कुटुंब सह परिवार घरात प्रवेश करतं. कुठेतरी जाऊन कानाकोपर्‍यात लपून बसलेली असतात. घरात लहान मुलं असतील तर, अजूनच धोका वाढतो. मुलं घरभर रांगतात. झुरळाच्या शरीरावरून जीवाणू घरभर पसरतात.(Cockroaches In The House? Try These '6' Remedies) बाळांना आजारी पाडतात. मोठ्यांना देखील त्रास होतोच.    


 
आपण मग झुरळांना मारण्यासाठी बाजारातून स्प्रे आणतो. पण ते धोकादायक असतात. विषारी असतात. घरातील व्यक्तींना त्याचा त्रास होतो. लहान मुलांच्या हाती चुकून जरी लागला, तर त्यांना त्याच्यापासून अत्यंत धोका असतो. मग अशा स्प्रेचा वापर करावा की नाही? तर नको. (Cockroaches In The House? Try These '6' Remedies) कारण असे काही घरगुती उपाय आहेत, जे केल्याने असे हानिकारक स्प्रे वापरण्याची वेळच येणार नाही. घरात झुरळं येणारच नाहीत.
  
झुरळांना पळवून लावण्याचे घरगुती उपाय

१. बोरिक पावडर
बोरीक पावडर आणि पीठीसाखर यांचे मिश्रण करून घराच्या कोपर्‍यांमध्ये ते पसरवा. साखरेसाठी झुरळं बाहेर येतात. पण बोरीक पावडरमुळे घरातून निघून जातात.

२. बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यात थोडी साखर मिक्स करा. आणि कोपर्‍यातून पसरवा. झुरळं पुन्हा घरात दिसणारच नाहीत. 

३. तमालपत्र
तमालपत्राची पाने घरात जमिनीवर ठेवा. जिथे-जिथे झुरळं लपून बसू शकतात, अशा सगळ्या ठिकाणी तमालपत्राची पाने ठेवा. तमालपत्राच्या वासाने झुरळं आणि इतर किडे घरात येत नाहीत. 

४. कडुलिंबाचे पाणी
कडुलिंबाच्या पाण्याने सतत घराची फरशी पुसा. तसेच खिडक्या पुसा असं केल्याने घर स्वच्छ होतं. किडे तसेच झुरळं घरात येतंच नाहीत. 

५. पेपरमिंट तेल 
पेपरमिंटचं तेल पाण्यात घालून त्याचा स्प्रे तयार करा. तो घरात मारत राहा. यामुळे झुरळं घरात येत नाहीत. 

६. व्हिनेगर
घरात व्हिनेगरचा स्प्रे तयार करून स्प्रे करा. त्यामुळे घरात झुरळं येतंच नाहीत. आठवड्यातून दोन तीनदा तरी जेवण ठेवण्याच्या जागेवर हा स्प्रे करा.  

Web Title: Cockroaches In The House? Try These '6' Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.