बीजिंगमधील एका कीटक-थीम असलेल्या म्युझियमने एक अशी कॉफी आणली आहे, जी पाहिल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मेलेलं झुरळ आणि वर कीटकांची पावडर, किडे असलेल्या या कॉफीला कॉकरोच कॉफी म्हटलं जातं. अशी कॉफी पिणं, त्यातील कॉकरोच खाणं तर सोडा, फक्त त्याकडे पाहिलं तरी लोकांना आता किळस वाटत आहे.
सोशल मीडियावर कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल झाली असून तिने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. याचीची जोरदार चर्चा रंगली आहे. ज्या लोकांनी या कॉफीची चव चाखली त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे. आंबट आणि थोडी मातीसारखी चव असल्याचं म्हटलं आहे. जवळपास ४५ युआन (अंदाजे ५०० रुपये) किंमत असलेली ही कॉफी सोशल मीडियावर ट्रेंडींगमध्ये आहे.
Exotic coffee with cockroaches and worms is now sold in China, launched by a Beijing museum. Made from safe ingredients from Chinese pharmacies, it offers a unique taste and aroma. Would you try it? pic.twitter.com/gYg134Vbq7
— Телеканал 360.ru (@360tv) November 19, 2025
मेनूनध्ये फक्त कॉकरोच कॉफी हा एकमेव पर्याय नाही, परंतु इतरही भन्नाट गोष्टी आहेत. विचित्र प्रयोग केले आहेत. पिचर वनस्पतींच्या पाचक रसांनी बनवलेली कॉफी दिसायला भयानक दिसते परंतु त्याची चव अगदी सामान्य आहे असं म्हटलं जातं. एक खास मुंग्यांचे ड्रिंक, जे फक्त हॅलोविनच्या वेळी विकलं जातं आणि काही तासांतच संपतं. काही ड्रिंकमध्ये कीटकांचं अर्क असतं.
असं अजब ड्रिंक सर्वात जास्त तरुण आणि व्लॉगर्स ट्राय करतात. त्यांच्यासाठी "शॉक व्हॅल्यू ड्रिंक" एक परफेक्ट कंटेंट बनलं आहे. झुरळं आहे हे म्हटल्यावर काही लोक पिण्यास स्पष्टपणे नकार देतात. सध्या कॉकरोच कॉफी हे फक्त एक ड्रिंक राहिलेलं नाही तर व्हायरल चॅलेंज देखील झालं आहे. काही लोक हे एडव्हेंचर असल्याचं म्हणत आहेत. तर काहींनी हा वेडेपणा असल्याचं सांगितलं.
