Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > ४ सेकंदात खेळ खल्लास! ब्यूटी फिल्टर जाताच समोर आलं खरं रूप, लाखो लोकांनी केलं अनफॉलो

४ सेकंदात खेळ खल्लास! ब्यूटी फिल्टर जाताच समोर आलं खरं रूप, लाखो लोकांनी केलं अनफॉलो

एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान असा एक तांत्रिक बिघाड झाला, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:31 IST2026-02-20T11:28:54+5:302026-02-20T11:31:45+5:30

एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान असा एक तांत्रिक बिघाड झाला, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

china influencer beauty filter glitch 140000 followers lost in 4 seconds on douyin viral posts claim | ४ सेकंदात खेळ खल्लास! ब्यूटी फिल्टर जाताच समोर आलं खरं रूप, लाखो लोकांनी केलं अनफॉलो

४ सेकंदात खेळ खल्लास! ब्यूटी फिल्टर जाताच समोर आलं खरं रूप, लाखो लोकांनी केलं अनफॉलो

चीनमधील एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान असा एक तांत्रिक बिघाड झाला, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. असा दावा केला जात आहे की, स्ट्रीमिंग एपचा 'ब्यूटीटी फिल्टर' काही सेकंदांसाठी बंद झाला आणि तिचा खरा चेहरा समोर आला. व्हिडिओमध्ये  फिल्टर सुरू असताना तिचा चेहरा दुधासारखा पांढरा शुभ्र, मोठे डोळे आणि शार्प जॉ-लाईन दिसत होती. मात्र, जसजसा फिल्टर गायब झाला, तसा तिचा नैसर्गिक स्किन टोन समोर आला. 

सोशल मीडियावर या घटनेनंतर China influencer viral video, beauty filter glitch, live streaming shock यांसारखे कीवर्ड्स ट्रेंड होऊ लागले आहेत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, या घटनेनंतर तब्बल १ लाख ४० हजार फॉलोअर्सनी तिला तातडीने अनफॉलो केले. जरी या आकड्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसली, तरी हा व्हिडीओ वेगाने शेअर केला जात आहे. 

चीनचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म 'Douyin' शी संबंधित हे प्रकरण असल्याचं सांगितलं जात आहे, जिथे फिल्टर्स आणि व्हर्च्युअल गिफ्ट्स हे कमाईचं मोठं साधन आहेत. आता इंटरनेटवर Live filter fail, Douyin beauty filter, influencer exposed असे सर्च वाढले आहेत. हा व्हिडीओ X (ट्विटर) वर @ClownWorld_ या हँडलवरून शेअर करण्यात आला, ज्यावर कमेंट्सचा पूर आला आहे. 

काही युजर्सनी लिहिलं की, "लाईव्ह स्ट्रीमिंग एप्समध्ये ब्यूटी फिल्टर असायलाच नको", तर काहींनी याला सरळसरळ "फसवणूक" म्हटलं आहे. डिजिटल युगात 'रिअल' आणि 'व्हर्च्युअल' मधील फरकावर ही बातमी प्रश्नचिन्ह उपस्थित करते. तो चार सेकंदांचा बिघाड कदाचित तांत्रिक होता, पण त्याने सोशल मीडियाच्या झगमगाटामागील सत्य जगासमोर आणलं आहे. फिल्टरच्या या जगात 'विश्वास' हीच खरी करन्सी आहे आणि तीच सध्या सर्वात नाजूक स्थितीत आहे.


Web Title : ब्यूटी फिल्टर की गड़बड़ी से खुली इन्फ्लुएंसर की पोल, खो दिए फॉलोअर्स।

Web Summary : एक चीनी इन्फ्लुएंसर के लाइव स्ट्रीम के दौरान ब्यूटी फिल्टर में खराबी आने से उसका असली चेहरा सामने आ गया। इससे ऑनलाइन हलचल मच गई और बड़ी संख्या में फॉलोअर्स कम होने की खबरें आईं। यह घटना वास्तविकता और आभासी दिखावे के बीच की धुंधली रेखाओं को उजागर करती है, जिससे डिजिटल युग में विश्वास पर सवाल उठते हैं।

Web Title : Beauty filter glitch exposes influencer's real face, loses followers.

Web Summary : A Chinese influencer's beauty filter malfunction during a live stream revealed her natural appearance. This caused a stir online, with reports of a significant follower drop. The incident highlights the blurred lines between reality and virtual appearances, raising questions about trust in the digital age.