Join us

Cat Asking Milk From Milkman : मांजरीनं व्यक्त केली ताजं दूध पिण्याची इच्छा; मालकाची सुपर फास्ट डिलिव्हरी पाहून तुम्हीही कराल कौतुक, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 13:47 IST

Cat Asking Milk From Milkman : व्हिडिओमध्ये एक गोंडस मांजर गाईच्या ताज्या दुधाची मागणी करताना दिसत आहे, ज्याला पाहून सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया थांबण्याचे नाव घेत नाहीत.

सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित  व्हिडिओ इंटरनेटवर पाहिले जातात, ज्यामध्ये मालक आणि पाळीव प्राण्यांचे  प्रेम, खोडकर शैली मन जिंकते. काहीवेळा या व्हिडिओंमधील पाळीव प्राण्यांच्या खोड्या आणि त्यांचा मुद्दा मांडण्याचा मार्ग हृदयाला स्पर्शून जातो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकत आहे. व्हिडिओमध्ये एक गोंडस मांजर गाईच्या ताज्या दुधाची मागणी करताना दिसत आहे, ज्याला पाहून सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया थांबण्याचे नाव घेत नाहीत. (Cat asking milk from milkman netizens loved it this video viral video of man fulfilling demand of cat)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस गायीचे दूध काढताना दिसत आहे. त्याचवेळी शेजारी एक मांजरही बसलेली दिसते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आधी मांजर काही वेळ त्या माणसाकडे पाहत राहते आणि नंतर त्याच्याकडे पायाने बोट दाखवत प्रेमाने ताजे दूध मागताना दिसते, त्यानंतर तो माणूस धारेनेच दूध पाजतो,  या संधीचा पुरेपूर फायदा घेत मांजरही दूध चाटते. 

रिसर्च-रोज आंबे खाल्ल्यानं कमी होतील म्हतारपणाच्या खुणा; पण किती प्रमाणात खायचा? जाणून घ्या

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फक्त प्रत्येकाचे हावभाव समजून घेण्याची गरज आहे.' ५४ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ५ लाख ७२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर २६ हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे.

५ मिनिटात साफ होईल पंख्यावर जमा झालेली धूळ; 3 ट्रिक्स, चकचकीत दिसेल घाण झालेला पंखा

सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडला असून त्यांनी त्यावर अनेक हृदयस्पर्शी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेम हे बिनशर्त असते.' दुसर्‍या वापरकर्त्याने कमेंट केली, 'व्वा इस व्हिडिओसे मेरा दिन बन गया.'

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया