Mango Benefits For Skin : रिसर्च-रोज आंबे खाल्ल्यानं कमी होतील म्हतारपणाच्या खुणा; पण किती प्रमाणात खायचा? जाणून घ्या

Published:May 5, 2022 11:34 AM2022-05-05T11:34:41+5:302022-05-05T12:18:43+5:30

Mango Benefits For Skin : आंबे आवडत नाहीत असा एकही जण सापडणार नाही. काहीजण तर आंबे खाण्यासाठीच या ऋतूची वाट पाहतात. (Benefits Of Mango On Skin) अप्रतिम चवीशिवाय आंबा त्वचेचं सौंदर्य वाढवण्याचेही काम करतो.

Mango Benefits For Skin : रिसर्च-रोज आंबे खाल्ल्यानं कमी होतील म्हतारपणाच्या खुणा; पण किती प्रमाणात खायचा? जाणून घ्या

उन्हाळ्यात आंब्यांचा आनंद घ्यायला सगळ्यांनाच आवडतो. आंबे आवडत नाहीत असा एकही जण सापडणार नाही. काहीजण तर आंबे खाण्यासाठीच या ऋतूची वाट पाहतात. (Benefits Of Mango On Skin) अप्रतिम चवीशिवाय आंबा त्वचेचं सौंदर्य वाढवण्याचेही काम करतो. (Anti ageing tips)

Mango Benefits For Skin : रिसर्च-रोज आंबे खाल्ल्यानं कमी होतील म्हतारपणाच्या खुणा; पण किती प्रमाणात खायचा? जाणून घ्या

तुमचा विश्वास बसणार नाही पण आंबा त्वचेवरील सुरकुत्या, म्हातारपणाच्या खुणा कमी करण्याचे काम करतो. नुकत्याच समोर आलेल्या रिसर्चनुसार आंबे खाल्ल्यानं त्वचेवरील सुरकुत्या टाळण्यास आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. (According to study eating this much of mango can lessen signs of ageing and reduce wrinkle)

Mango Benefits For Skin : रिसर्च-रोज आंबे खाल्ल्यानं कमी होतील म्हतारपणाच्या खुणा; पण किती प्रमाणात खायचा? जाणून घ्या

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी 2020 मध्ये अतुल्फो या आंब्याच्या विविधतेवर अभ्यास केला. यामध्ये रजोनिवृत्तीच्या टप्प्यातून जात असलेल्या महिलांचा समावेश केला होता. यामध्ये महिलांची दोन गटात विभागणी करून त्यांना ठराविक प्रमाणात आंबे खायला देण्यात आले. यातून जे निकाल समोर आले ते थक्क करणारे होते.

Mango Benefits For Skin : रिसर्च-रोज आंबे खाल्ल्यानं कमी होतील म्हतारपणाच्या खुणा; पण किती प्रमाणात खायचा? जाणून घ्या

एका गटाला 85 ग्रॅम आणि दुसऱ्या गटाला 250 ग्रॅम आंबे 16 आठवड्यांसाठी दररोज देण्यात आले. कमी प्रमाणात आंब्याचा आहार घेणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरील खोल सुरकुत्याही कमी झाल्याचं नंतर समोर आलं. याउलट 250 ग्रॅम आंबा खाणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढतच गेल्या होत्या.

Mango Benefits For Skin : रिसर्च-रोज आंबे खाल्ल्यानं कमी होतील म्हतारपणाच्या खुणा; पण किती प्रमाणात खायचा? जाणून घ्या

त्वचा वृद्धत्वाचे सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणजे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांचा संपर्क. आंबा त्याचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करू शकतो. दक्षिण कोरियामध्ये २०१३ मध्ये उंदरांवर प्रयोग करण्यात आले होते. ते तीन गटांमध्ये विभागले गेले आणि ते UVB किरणांच्या विविध स्तरांच्या संपर्कात आले.

Mango Benefits For Skin : रिसर्च-रोज आंबे खाल्ल्यानं कमी होतील म्हतारपणाच्या खुणा; पण किती प्रमाणात खायचा? जाणून घ्या

ज्या उंदरांना आंब्याचा रस पाण्यात मिसळून दिला गेला, त्यांच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी झाल्याचं दिसून आलं. इतकेच नाही तर त्वचा तरुण ठेवण्यासाठी महत्त्वाच्या मानला जाणारा आंब्याचा अर्क घेणाऱ्या उंदरांमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढल्याचेही समोर आले आहे. त्याच बरोबर, एपिडर्मल जाडी देखील वाढली, ज्यामुळे UVB पासून सुरक्षा मिळाली.