New Research On Human Lifespan Extension : मनुष्यांचं आयुष्य कसं वाढवता येईल हा वैज्ञानिकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिलाय. त्याबाबत वेगवेगळी संशोधनं सुरू असतात. विज्ञानाच्या क्षेत्रात आज मोठी प्रगती झाली आहे. पण संशोधक अजूनही वाढत्या वयाची प्रक्रिया कशी स्लो करता येईल आणि वाढत्या वयात होणारे आजार कसे रोखता येतील याचा शोध घेत आहेत. अशात चीनमधील एका बायोटेक कंपनीच्या यासंबंधी एका दाव्यावर वाद पेटला आहे.
शेन्जेन येथील स्टार्टअप Lonvi Biosciences कंपनीचा दावा आहे की, त्यांनी एक अशी गोळी विकसित केलीये, जिच्या मदतीने मनुष्य भविष्यात १५० वर्ष जगू शकतात. कंपनीनुसार, त्यांचं हे संशोधन शरीरातील असे नुकसानकारक सेल्स नष्ट करण्यावर केंद्रीत आहे, जे मनुष्यांची वय वाढण्याची प्रक्रिया वेगवान करतात. सोशल मीडिया आणि वैज्ञानिक मंचावर समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, हे औषध द्राक्षाच्या बियांमधील तत्वांपासून तयार केलं आहे. जे शरीरातील खासप्रकारच्या सेल्सना टार्गेट करतं. या कोशिकांना सामान्य भाषेत 'झोम्बी सेल्स' म्हटलं जातं.
कशाला म्हणतात झोम्बी सेल्स?
सायन्सच्या भाषेत झोम्बी सेल्सना senescent cells म्हटलं जातं. हे असे सेल्स असतात जे डॅमेज झालेले असतात किंवा म्हातारे झालेले असतात. हे सेल्स विभाजीत होणं बंद करतात, पण मरत नाहीत. हे शरीरात तसेच राहतात आणि आजूबाजूला सूज निर्माण करण्यासाठी रसायन सोडत राहतात. काळानुसार हे सेल्स शरीरात जमा झाल्याने वेगवेगळ्या समस्या होतात. वैज्ञानिक सांगतात की, हेच सेल्स वाढत्या वयात होणारे आजार जसे की, हृदयरोग, संधिवात आणि न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये भूमिका बजावतात.
नवं औषध कसं काम करेल?
कंपनीचा दावा आहे की, ही गोळी शरीरातील हे डॅमेज सेल्स नष्ट करण्यास मदत करू शकते. जर हे सेल्स कमी केले गेले तर शरीरात होणारी सूज आणि टिश्यूचं होणारं नुकसानही कमी केलं जाऊ शकतं. आयुष्य वाढवणाऱ्या रिसर्चमध्य वैज्ञानिक आधीच senolytics नावाच्या औषधांवर काम करत आहेत. ज्याचा उद्देश हे म्हातारे सेल्स नष्ट करणं हा आहे. सुरूवातीच्या प्रयोगांमध्ये प्राण्यांवर याचा काही सकारात्मक परिणामही बघायला मिळाला.
A Chinese startup claims its new grape-seed extract pill could push human longevity to a record-breaking 150 years by purging inflammatory "zombie cells."
— Next Science (@NextScience) March 5, 2026
Lonvi Biosciences, a startup based in Shenzhen, is making headlines with its development of a potential anti-aging treatment… pic.twitter.com/fod1tz1ujR
कधी येणार औषध?
वैज्ञानिक सांगतात की, अशाप्रकारचं कोणतंही औषध मनुष्यांसाठी सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध करण्यासाठी अजून बराच काळ लागू शकतो. कोणतीही नवीन थेरपी सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याआधी तिला वेगवेगळे क्लीनिकल ट्रायलमधून जावं लागेल.
