Join us

नवरानवरीच्या खोलीत येत नातेवाईकांनी ‘पहिल्या रात्री’ केला भन्नाट डान्स, बिच्चारे ते दोघे.. व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:46 IST

Bride Groom Video Family Members Dance In The Room : लग्नानंतर वधू सासरच्या घरी गेल्यावर तिने तिच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला.

सध्या लग्नसराईचा सीझन सुरु असून सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत आहेत. लग्नात अशा अनेक घटना घडतात ज्या कधी कधी आश्चर्यकारक किंवा धक्कादायक वाटतात. वराची एंट्री असो की नववधूचे स्टेजवर नाचणे असो. नेहमी या प्रसंगाना धम्माल येते. काहीजण वरमाला दरम्यानच्या धमाल-मस्तीचा व्हिडिओ पोस्ट करतात तर काहींनी मंडपात पंडितजींसोबत हसण्याचा आणि विनोद करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. (Bride groom video family members dance in the room on the day of suhaag raat)

सध्या सोशल मीडियावर व्हायरल  होत असलेल्या एका व्हिडिओने लोकांना खूप हसवलंय. लग्नानंतर वधू सासरच्या घरी गेल्यावर तिने तिच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. लग्नानंतर वर आपल्या वधूला तिच्या सासरच्या घरी घेऊन येतो. वराच्या कुटुंबियांना वधूला सरप्राईज करायचे होते आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडं आश्चर्यचकित करेल. लग्नानंतर परतलेल्या वराची खोली हनिमूनसाठी चांगलीच सजवली होती. 

वराने वधूसोबत खोलीत प्रवेश केला तेव्हा त्यांची तयारी पाहून आश्चर्यचकित झाले. खोली मस्त सजवली होती आणि हे सर्व पाहून वधू-वर खूप आनंदी झाले. हनिमूनच्या रात्री अचानक कुटुंबातील सर्व सदस्य रात्री उशिरा आले तेव्हा सर्वात मजेदार गोष्ट घडली. पलंगावर बसलेल्या नववधूसमोर घरातील सदस्य नाचू लागले आणि आनंदाने 'रब ने बना दी जोडी'वर नाचू लागले. तर समोर बसलेली वधूही घरच्यांना पाहून टाळ्या वाजवत होती.

केस धुतल्यानंतर तुटून हातात येतात? ५ टिप्स वापरा, केस गळती थांबून भराभर वाढ होईल

वराच्या चेहऱ्याकडे पाहताना असे वाटले की तो खूप थकला आहे आणि त्याला विश्रांतीची गरज आहे.  काही सेकंदांचा व्हिडिओ इंटरनेटवर येताच लोक थक्क झाले. हा व्हिडिओ skg_photography_official ने इंस्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालग्न