बाईने कसं सहनशील असावं. जास्त बोलू नये आणि कोणी काही बोललं तर वाईट वाटून घेऊ नये. सहनशक्ती चांगली असणं हे चांगली स्त्री असल्याचं लक्षण असतं. आई, आजी, मावशी, काकू या आदर्श मानल्या जातात का तर त्यांनी फार सहन केलं. (Bold women creates history - Priyanka chopra talks about true feminism , listen to yourself never obey )समाजात असलेली ही मान्यता कितपत योग्य आणि कितपत चुकीची हा तर प्रत्येकाच्या मानसिकतेचा भाग झाला. पण महिलांचं आयुष्य खरंच फक्त सहन करत राहण्यासाठीच असतो का?
बॅडमिंटन क्षेत्रात भारताला एक वेगळी ओळख निर्माण करुन देणारी पी.व्ही.सिंधू म्हणते, महिलांनी क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. छान सगळं ऐकून घेणारी समाजाच्या दृष्टीत चांगली असलेली मुलगी होऊन राहील्यावर असे विक्रम करता येत नाहीत. त्यासाठी नियम मोडावेच लागतात. बदलत्या जगानुसार समाजाला आकार द्यावा लागतो. ठराविक विचारसारणीच्या बाहेर जाऊन काही करु पाहणाऱ्या महिलांचे कौतुक करणं गरजेचं आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
प्रियांका चोप्रा कायमच बिनधास्त स्त्रीवादी मतं मांडताना दिसते. प्रियांका म्हणते, समाज तुम्हाला चांगली आणि संस्कारी मुलगी कशी असते असं सांगून सगळ्या बाजूंनी कोंडून ठेवते. त्यांची व्याख्या मात्र चुकीची आहे हे समजून घ्या. अगं मुलींना सहन करावंच लागतं हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण तुम्ही कोणाचाही त्रास सहन करण्यासाठी बांधिल नाही. तुमच्या हक्काची गोष्ट आणि समाजात मान मिळवणं तुमचा हक्क आहे. त्यासाठी मात्र समाजाने तयार केलेली चांगली सोज्वळ मुलगी नाही तर आदर्शांवर जगणारी बिनधास्त मुलगीच हवी.
मोठे यश मिळवणाऱ्या सगळ्या महिलांनी समाजाच्या चौकटी मोडल्या आहेत. घरात सगळ्या हो ला हो करणाऱ्या आज्ञाधारक मुली कायमच चौकटीत अडकून राहतात. त्यामुळे बिनधास्त जगा. प्रसिद्ध लेखिका आणि उद्योजक राधिका गुप्ता म्हणते, आपल्याकडे एक म्हण आहे, "अंथरुण पाहून पाय पसरावे." ही म्हण समाजात फक्त महिलांनाच लागू होताना दिसते, ते ही अर्थाचा अनर्थ करुन. त्यामुळे तुम्ही अजिबात अंथरुणाची काळजी करु नका. बिनधास्त पाय पसरा. चौकटीत राहू नका. सहन करणं, मर्यादा सांभाळणं महिलांचं कर्तव्य आहे या विचाराला कुठेतरी आता थांबवणे गरजेचे आहे. तुम्हालाही सगळं गुपचूप सहन करायची सवय लागली असेल तर एकदा स्वतःला विचारुन पाहा, मन मारुन रडत खडत जगणं खरंच गरजेचं आहे का?
Web Summary : Sindhu and Priyanka urge women to break societal norms. Don't just endure; claim your rights. Shed the 'good girl' image, be fearless, and challenge limitations. Redefine womanhood.
Web Summary : सिंधु और प्रियंका महिलाओं से सामाजिक मानदंडों को तोड़ने का आग्रह करती हैं। सिर्फ सहन न करें; अपने अधिकारों का दावा करें। 'अच्छी लड़की' की छवि छोड़ें, निडर बनें और सीमाओं को चुनौती दें। नारीत्व को फिर से परिभाषित करें।