तुम्ही अगदी आइनस्टाइन व्हा पण लोकं तुमचे केस का कुरळे असंच विचारतात. आजकाल अपयशापेक्षा टोमणे , ट्रोलींग या गोष्टींची भीती जास्त वाटते. पण या भीतीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन या एका लहान मुलीने दिला. प्राची निगम हिने २०२४ मध्ये दहावीच्या परीक्षेत अव्वल येत मोठं यश मिळवलं. मेहनत, सातत्य आणि अभ्यासाची जिद्द याच्या जोरावर तिने पहिला क्रमांक पटकावला. कोणत्याही विद्यार्थ्यासाठी हा क्षण अभिमानाचा असतो. (Board topper girl faces brutal trolling, responds strongly, tells how to deal with social media )कुटुंबासाठी, शिक्षकांसाठी आणि स्वतःसाठीही. पण या यशाच्या क्षणीच तिच्यासोबत जे घडलं, ते मात्र विचार करायला लावणारं आहे.
प्राचीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. तिच्या यशाचं कौतुक करण्याऐवजी काही लोकांनी तिच्या दिसण्यावर, विशेषतः चेहऱ्यावरच्या केसांवर (facial hair) टिप्पणी करत विनोद केले. तिच्या फोटोचे मीम्स बनवले, अनावश्यक कमेंट्स केल्या गेल्या. एका विद्यार्थिनीच्या परिश्रमावर पाणी फेरून, तिच्या व्यक्तिमत्त्वावर टीका करणं ही खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे. तिला मीम मटेरीयल बनवणारे काही १० - १५ नव्हते तर लाखो लोकांनी तिच्यावर घाणेरड्या कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आणि कोणाला त्या गोष्टीबद्दल काहीही वाटलं नाही. सगळे हसले स्क्रोल केलं आणि सोडून दिलं. पण प्राचीला काय वाटलं असेल ? तिचं तर मनोबल डगमगलं असेल असे समजून एका मुलाखतीत बरखा दत्तने मुलीला प्रश्न केला, मात्र त्यावर मुलीचे उत्तर ऐकून सगळ्यांना हसू आले आणि ट्रोलींगकडे पाहायचा दृष्टिकोनच बदलून गेला.
प्राची म्हणाली," माझ्या शिक्षकांनी किंवा मित्रमैत्रीणींनी कधीही माझ्या दिसण्यावरुन माझी खिल्ली उडवली नाही. त्यामुळे मी कशी दिसते किंवा मझ्या चेहऱ्यावर केवढे केस आहेत याचा विचार कधी मी केलाच नव्हता. निकाल लागल्यानंतर जेव्हा सोशल मिडियावर सगळीकडे माझे मिम्स माझ्या घरच्यांनी पाहिले मी पाहिले तेव्हा मला कळलं की मी चांगलीच ट्रोल झाले आहे. पण मला तर बरंच वाटतंय की त्यांनी मला ट्रोल केलं कारण त्यानंतर काही चांगल्या आणि खास , प्रसिद्ध लोकांनी माझी भेट घेतली आणि माझं कौतुक केलं. दरवर्षी कोणतरी पहिलं येतंच पण मी प्रसिद्ध झाले कारण मी ट्रोल झाले. मला तर अजिबात वाईट वाटलं नाही. तुम्ही चांगलं करा तरी ट्रोलच होणार आणि वाईट केलं तरी ट्रोलच होणार त्यामुळे काय करायचं हे आपल्याच हातात आहे. ज्यांना प्रत्येक गोष्टीत खोटच काढायची आहे त्यांना ते करत राहू दे. लोगोंका तो काम ही केहना है!! तुम्ही तुमचं काम करत राहा. लक्ष देऊ नका.
आजच्या सोशल मिडियाच्या काळात ट्रोलिंग ही वाढती गोष्ट आहे आणि ती आता कायम राहणारच आहे. त्यामुळे त्याचाकडे दुर्लक्ष करण्याखोरीज इतर काहीच मार्ग नाही हे खरं आहे. प्राचीचा सल्ला अनेकांसाठी प्रोत्साहन देणारा ठरतो. ती म्हणते," वाईटातही चांगलंच शोधा आणि चांगलंच करत राहा."
Web Summary : Prachi Nigam, a tenth-grade topper, faced online trolling for her appearance. She responded positively, stating the attention led to recognition and didn't affect her. Her message: focus on your work and ignore negativity.
Web Summary : प्राची निगम, दसवीं कक्षा की टॉपर, को उनकी दिखावट के लिए ऑनलाइन ट्रोल किया गया। उन्होंने सकारात्मक जवाब दिया, कहा कि इस ध्यान से उन्हें पहचान मिली और इस बात से उन्हें कोई फर्क नहीं पड़ा। उनका संदेश: अपने काम पर ध्यान दें और नकारात्मकता को अनदेखा करें।