होळी , धुळवड आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचे सण. संपूर्ण भारतभर आता विविध रंग पसरतील. (Before Playing Holi Remember To Do These 4 Things)होळी जरी एकच दिवस खेळलो, तरी आठवडाभर आधीपासूनच त्या होळीची नशा हवेमध्ये पसरलेली असते. होळीनंतरही बरेच दिवस चेहेरे रंगीबेरंगी दिसतात. काही रंग जाता जात नाहीत. मग निळे, पिवळे, लाल असे चेहेरे घेऊनच काही दिवस फिरावं लागतं.(Before Playing Holi Remember To Do These 4 Things)
आजकाल बाजारात मिळणाऱ्या रंगांचा दर्जा फार चांगला नसतो. ऑर्गेनिक रंगही आपण तयार करून वापरू शकतो. तसेच विकतही आणू शकतो. पाण्याने होळी खेळा किंवा सुक्या रंगाने काही साध्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. (Before Playing Holi Remember To Do These 4 Things)रंगामुळे त्वचेची वाट लागू नये यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा. रंग खेळायला जायच्या आधी काळजी घ्या. नंतर बिनधास्त रंगाने माखून जा.
१. रंग विकत घेताना त्याचा वास घ्या. जर पेट्रोलसारखा वास येत असेल, तर तो रंग ऑर्गेनिक नाही. त्यामध्ये रासायनिक पदार्थ आहेत.
२. सुट्टे रंग विकत घेणं टाळा. ते स्वस्त मिळतात म्हणून आपण विकत घेतो. पण ते स्वस्त असतात कारण ते भेसळयुक्त असतात. असे रंग विकत घेऊ नका. थोडे महाग पडले तरी चालेल. पण हयगय करू नका.(होळी 2025)
३. पाण्याचे फुगे वापरणं टाळा. त्याचा मार जोरदार बसू शकतो. जर नाजूक अवयवाला फटका बसला तर, तो अवयव निकामी होण्याची शक्यता आहे. अनेक जणांबरोबर असा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे अशा वस्तू विकत घेऊच नका.
४. रंग खेळायला जाण्याआधी चेहर्याला व्यवस्थित तेल चोळा. कानालाही तेल लावा. तेलामुळे रंग चिकटून राहत नाही. त्वचेत मुरत नाही.
५. कानामध्ये रंग जर आतपर्यंत गेला तर, कानाला दुखापत होऊ शकते. तो रंग आत चिकटला तर बाहेर काढणे मुश्कीलीचे होते. त्यामुळे कानात कापसाचा बोळा घाला. जरा मोठा वापरा. अगदी लहान नको. म्हणजे पाणी लागले तरी काही हरकत नाही.
६. रंग खेळून झाल्यावर घरी आलात की चेहर्याला लिंबू चोळा. चुकून जरी कोणी रासायनिक रंग लावला असेल तर, त्याचा त्रास होणार नाही.