Join us

५ गोष्टी चुकूनही ठेवू नका स्टीलच्या भांड्यात, पोट सतत बिघडतं- ‘हे’ वाचा कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:38 IST

Foods in steel utensils : अशा काही गोष्टी असतात ज्या या भांड्यांमध्ये ठेवल्यास टेस्टमध्ये फरक पडतो, सोबतच पदार्थांचं शेल्फ लाइफही कमी होऊ शकता. पाहुयात कोणत्या गोष्टी स्टीलच्या भांड्यात ठेवू नये.

Foods in steel utensils : जेवण बनवण्यासाठी आणि किचनमधील गोष्टी ठेवण्यासाठी भरपूर लोक स्टीलच्या डब्यांचा, भांड्यांचा वापर करतात. एकतर स्टीलची भांडी जास्त काळ टिकतात आणि दिसतातही चकाचक. आधी तांबे, पितळ आणि अ‍ॅल्यूमिनिअमची भांडी अधिक वापरली जात होती. पण आता स्टीलचा जमाना आहे. कारण ही भांडी भरपूर टिकतात आणि स्वस्तही मिळतात. पण ही भांडी वापरत असताना सरधोपटपणे यांमध्ये काहीही ठेवून चालत नाही. अशा काही गोष्टी असतात ज्या या भांड्यांमध्ये ठेवल्यास टेस्टमध्ये फरक पडतो, सोबतच पदार्थांचं शेल्फ लाइफही कमी होऊ शकता. पाहुयात कोणत्या गोष्टी स्टीलच्या भांड्यात ठेवू नये.

दही

दही स्टीलच्या भांड्यांमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे. कारण दही तयार केल्यावर अनेक दिवस वापरलं जातं. बरेच लोक स्टीलच्या भांड्यात दह्याला विरजण लावतात आणि त्यातच स्टोर करून ठेवतात. जेव्हा आपण जास्त दिवस स्टीलच्या भांड्यात दही ठेवतो तेव्हा याची टेस्ट बदलू शकते. त्यामुळे दह्याला विरजण लावण्यासाठी चीनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा.

लोणचे

स्टीलच्या डब्यात कधीही लोणचे ठेवू नये. कारण लोणचे तयार करण्यासाठी तेल-मसाले, मीठ, व्हिनेगर इत्यादींचा वापर केला जातो. या गोष्टी धातुसोबत प्रक्रिया करतात. जर चांगल्या गुणवत्तेचं स्टील नसेल तर लोणच्याची टेस्ट बलदू शकते किंवा ते खराब होऊ शकतं. त्यामुळे लोणच्याची टेस्ट किंवा सुगंध बिघडू नये म्हणून ते काचेच्या बरणीत ठेवावं.

फळं किंवा सलाद

बरेच लोक ऑफिसला जाताना किंवा शाळेत मुलांना स्टीलच्या डब्यात कापलेली फळं किंवा सलाद ठेवतात. स्टीलच्या डब्यात जास्त वेळ कापलेली फळं किंवा सलाद ठेवाल तर याची टेस्ट बिघडू शकते. या गोष्टी ठेवण्यासाठी एअरटाइट काचेच्या बरणीचा वापर केला जाऊ शकतो. तसेच सुरक्षित प्लास्टिकच्या डब्याचा देखील वापर होऊ शकतो.

लिंबाचे पदार्थ

स्टीलच्या भांड्यात आंबट गोष्टी ठेवू नये. लिंबाचे वेगवेगळे पदार्थ जसे की, लेमन साइस किंवा लोणचे, चिंच या गोष्टी स्टीलच्या डब्यात ठेवू नये. असं केल्यास त्यांची टेस्ट कमी होते.

टोमॅटो असलेले पदार्थ

ज्या पदार्थांमध्ये टोमॅटो अधिक टाकलेले असतात, ते कधीही स्टीलच्या भांड्यात किंवा डब्यात ठेवू नये. हे पदार्थ स्टीलसोबत मिळून प्रक्रिया करतात. ज्यामुळे पदार्थांची टेस्ट तर बदलतेच, सोबतच त्यातील पोषक तत्वही कमी होतात.

टॅग्स :किचन टिप्सहेल्थ टिप्सअन्न