विठ्ठलाची भजने, भक्तीगीते आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. संत एकनाथांनी लिहिलेली भजने असतील किंवा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या लिखाणात कायम तुळशीचा उल्लेख असतो. तुळशीला भारतात फार महत्व आहे. धार्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या तुळस उपयुक्त मानली जाते. आषाढी एकादशीला तुळस महत्त्वाची मानली जाते.(Ashadhi Ekadashi 2025, Tulsi is known for many things, see why basil is so important ) वारीतील वारकरी डोक्यावर तुळस घेऊन पंढरपूरची वाट चालतात. तुळशीला लक्ष्मीचे रुप मानले जाते. तुळस म्हणजे देवी असे मानले जाते त्यामुळे तिला डोक्यावरच बसवायचे अशी भावना वारकरी महिल्यांच्या मनाच असते. वारकरी सांप्रदायातील लोक गळ्यात तुळशी माळ घालतात. श्रावणात खास म्हणजे आषाढीला तुळशीचे पूजन करुन ही माळ गळ्यात घालण्याची परंपरा महाराष्ट्रात खास म्हणजे वारकरी समूहात आहे.
तुळशीची पाने खाणे पुण्याचे आणि प्रसन्न मानले जाते. मात्र तुळशीचे महत्व फक्त आध्यात्मापुरते मर्यादीत नाही. तुळस आरोग्यासाठी प्रचंड फायद्याची असते. तुळस खाणे आणि दारात तुळस असणे आरोग्यासाठी फार चांगले ठरते. तुळशीची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात. तसेच अँण्टी-बॅक्टेरियल असतात. अँण्टी-व्हायरल, अँण्टी-फंगल आणि अँण्टी-इंफ्लेमेटरी असतात. या गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला, ताप तसेच विविध संक्रमणांपासून बचाव होतो. तुळशीची पाने खाणे एकदम फायद्याचे ठरेल.
श्वसनाचा काही त्रास असेल तर तुळस फार उपयुक्त ठरेल. तसेच त्वचेसाठी तुळस वरदान आहे. केसांसाठीही फायद्याची ठरते. मानसिक ताणही तुळशीच्या पानामुळे कमी होतो. तसेच तुळस स्वच्छ आणि भरपूर ऑक्सिजन देते. त्यामुळे दारात तुळस असावी असे म्हटले जाते.
तोंडाची स्वच्छता राखण्यातही तुळस उपयोगी आहे. तिच्या अँण्टी-ऑक्सिडेंटस आणि अँण्टी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे त्वचेवरील संसर्ग, मुरुम, खाज, तोंडातील दुर्गंधी आणि हिरड्यांचे आजार कमी होतात. तुळशीचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. तसेच ब्यूटी प्रॉडक्ट्स मध्ये केला जातो. तुळशीचे फायदे असे मिळवण्यापेक्षा रोज तुळशीची दोन पाने खा. आरोग्यासाठी ही सवयी फार उपयुक्त ठरेल. तुळशीतील या सर्व गुणांमुळेच तिला देवाच्या स्थानी पाहीले जाते.