आपल्या मुलाला यशस्वी झालेलं पाहणं हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. त्यांच्यासाठी तो दिवस सर्वात जास्त आनंदाचा दिवस असतो. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबात मुलाला किंवा मुलीला नोकरी मिळाल्यानंतर घरातील वातावरणच बदलतं. पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागतो. पालकांची छाती अभिमानाने फुलते, आता चांगले दिवस येतील असं वाटू लागतं.
इंटरनेटवर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, या व्हिडीओने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओ पाहून युजर्स भावुक झाले. flix.indian नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक जवान सैन्यात भरती झाल्यावर आपल्या आई-वडिलांना भेटतो. यानंतर तो आपल्या पालकांचा मोठा सन्मान करतो.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की, सैन्यात भरती झाल्यानंतर पहिल्यांदाच घरी आलेला तरुण आपल्या पालकांना सॅल्यूट करतो. मग तो त्याची टोपी आणि स्वागतासाठी दिलेला हार काढून वडिलांना घालतो. तो त्याच्या आईच्या गळ्यात हार घालतो. व्हिडिओच्या शेवटी तो त्याच्या पालकांच्या पाया पडून त्यांना मिठी मारताना दिसतो.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला सुंदर व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पोस्ट झाल्यापासून लाखो युजर्सनी तो पाहिला आहे. अडीच लाखांहून अधिक युजर्सनी लाईक केलं आहे. युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओमध्ये पालक आणि मुलामधील दिसणारं प्रेम भारावून टाकणारं आहे.