आपल्या घराला आपण जरी स्वत:चे समजत असलो तरी ते फक्त आपल्यासाठी कधी उरतच नाही. इतरही अनेक जीवजंतू आपल्या घरात विना परवानी आणि विना मोबदला राहत असतात. (Are you bothered by mosquitoes, flies, and ticks? Follow these 5 remedies, these insects will not roam around your house)आपल्याला त्यांचे घरातील अस्तित्व माहितीही नसतो. मात्र अचानक त्यांची संख्या वाढायला लागते आणि मग घरात झुरळे, उंदीर, पाली, मुंग्या असे प्राणी दिसायला लागतात. त्यांची आपल्याला भीतीही वाटते आणि त्यांच्यामुळे रोगराईही पसरते. त्या प्राण्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी आपण विविध उपाय करतो. मात्र एक असा कीटक आहे जो संध्याकाळी ठरल्या वेळी घरात येतो. दारं लावा, खिडक्या लावा तरी येतोच. तो म्हणजे डास. कचाकच चावतात. हाताला पायाला खाज सुटते. खाजवल्यामुळे फोड उठतात. डासांमुळे साथीचे आजार जास्त वेगाने पसरतात. तसेच अन्नाजवळ माशी असते. हा ही तसाच प्रकार. पावसाळा आल्यावर घरात चिलट्यांचे प्रमाण वाढते. लाईटजवळही फिरताना दिसतात. या किटकांना घरातील वावर बंद व्हावा यासाठी काही सोपे उपाय करता येतात.
१. घरात पाणी साचू देऊ नका. पाणी साचले की त्यात लगेच डासांचा जन्म होतो. फुलदाण्या, कुंड्या, कूलर बादली आदी गोष्टींमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायची. पाण्याची टाकी वेळोवेळी साफ करायची आणि झाकून ठेवायची.
२. दरवाजा खिडकी यांना जाळ्या लावायच्या. दरवाज्या फटी भरून घ्यायच्या. खिडकीलाही काही छिद्रे असतील तर ती बुजवायची.
३. डास, चिलटी येऊ नयेत म्हणून खरे तर धुरी केली जाते. (Are you bothered by mosquitoes, flies, and ticks? Follow these 5 remedies, these insects will not roam around your house)मात्र शहराच्या ठिकाणी किंवा बंद घरांमध्ये धुरी करणे शक्य नाही. जर शक्य असेल तर रोज संध्याकाळी शेणाच्या गोवऱ्यांची धुरी करा. पण शक्य नसेल तर घरी धुप लावायचा. घरभर फिरवायचा.
४. लिंबाच्या व लवंगाच्या वासाने डास येत नाहीत. हा उपाय अनेक ठिकाणी केला जातो. लिंबाच्या फोडीत लवंग घुसवायची आणि खिडकीपाशी ठेवायची. चिलटीही येत नाहीत. तसेच घरात लिंबाचा रस आणि लवंगचा रस काढून फवारणी केली तरी फायदा होतो.
५. मच्छरदाणी वापरा. डासांपासून वाचण्यासाठी घरोघरी केला जाणारा हा उपाय नक्कीच फायद्याचा आहे. झोपताना शांतता मिळेल.