Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > 'लेकीचं स्वागत..' म्हणत टिना अंबानींनी केलं सुनेचं स्वागत; इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणाल्या..

'लेकीचं स्वागत..' म्हणत टिना अंबानींनी केलं सुनेचं स्वागत; इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणाल्या..

Social viral: शाही लग्न सोहळ्यापेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती टिना अंबानी यांच्या इन्स्टाग्राम पोस्टची.. नव्या सुनेचं स्वागत टिना यांनी खूपच मनापासून आणि वेगळ्या पद्धतीने केलं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 14:53 IST2022-02-28T14:52:43+5:302022-02-28T14:53:55+5:30

Social viral: शाही लग्न सोहळ्यापेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती टिना अंबानी यांच्या इन्स्टाग्राम पोस्टची.. नव्या सुनेचं स्वागत टिना यांनी खूपच मनापासून आणि वेगळ्या पद्धतीने केलं आहे. 

Anil ambani's wife Tina Ambani welcomes krisha shah by saying her daughter, her instagram post is viral | 'लेकीचं स्वागत..' म्हणत टिना अंबानींनी केलं सुनेचं स्वागत; इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणाल्या..

'लेकीचं स्वागत..' म्हणत टिना अंबानींनी केलं सुनेचं स्वागत; इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणाल्या..

Highlightsटिना यांची ही पोस्ट कमालीची व्हायरल झाली असून एक- दोन दिवसांतच या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत. 

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil ambani) आणि टिना अंबानी (Tina Ambani) यांच्या मोठ्या मुलाचा म्हणजेच अनमोलचा विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला... बिग बींच्या स्टार फॅमिलीपासून ते बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींची, उद्योगपतींची या सोहळ्याला हजेरी होती.. अंबानींच्या घरचंच लग्न ते.. त्यामुळे तिथला थाटबाट आणि श्रीमंती या संदर्भातल्या पोस्ट सोशल मिडियावर (social media) प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. पण आता या शाही लग्न सोहळ्यापेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती टिना अंबानी यांच्या इन्स्टाग्राम पोस्टची (Tina Ambani's instagram post is viral)..

 

नव्या सुनेचं स्वागत टिना यांनी खूपच मनापासून आणि वेगळ्या पद्धतीने केलं आहे. त्यांच्यासारखी सासू प्रत्येक लेकीला मिळावी असं आता ही पोस्ट वाचणाऱ्या मैत्रिणींना वाटत आहे.. सासू- सुनेचं नातं आता बदलत चाललं आहे. अगदी माय- लेकीसारखं ओसंडून वाहणारं प्रेम नसलं तरी आधीच्या काळातल्या सासू- सुनांचा खाष्ट रुसवा- फुगवाही आता बऱ्याच ठिकाणी उरलेला नाही, हे ही तेवढंच खरं... हाच बदल आता आपल्याही घरात घडवून आणू पाहत आहेत टिना अंबानी.. 

 

त्याचं झालं असं की मुलाचं लग्न झाल्यानंतर दोन- तीन दिवसांनी टिना अंबानी यांनी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या सुनेचा म्हणजेच कृषा शाह हिचा उल्लेख daughter in law असा न करता फक्त daughter असाच केला आहे. या पोस्टमध्ये त्या लिहितात की आमच्या मुलीचं स्वागत आहे.. कृषा घरात आल्यामुळे घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. तिच्या येण्याने मुलगा अनमोल याच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कृषाच्या येण्यामुळे घरात एक नवी उर्जा आली असून ही आमच्या सगळ्यांसाठीच एक नवी सुरुवात आहे.. 

 

ही पोस्ट शेअर करताना टिना यांनी एक फॅमिली फोटो शेअर केला असून यामध्ये त्या स्वत:, अनमोल, अनिल अंबानी आणि कृषा असे चौघे आहेत. चौघेही अतिशय आनंदी दिसत असून खळखळून हसत आहेत. टिना यांची ही पोस्ट कमालीची व्हायरल झाली असून एक- दोन दिवसांतच या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत. 

 

Web Title: Anil ambani's wife Tina Ambani welcomes krisha shah by saying her daughter, her instagram post is viral