Join us

आलिया भटने लावली काजळाची तीट, कुणी म्हणाले खुबसुरत तर कुणी केली ‘टिकावर’ टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2024 18:09 IST

Alia Bhatt Puts 'Nazar Ka Kaala Tika' Behind Her Ear During Met Appearance, Photo Goes Viral : अभिनेत्रीचा मेट गालातील ‘तो’ फोटो सोशल मीडियात व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल..

लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) हिने अल्पावधीतच बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये अभिनयाचा झेंडा रोवला. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिची चर्चा सोशल मीडियात प्रचंड होते. तिने नुकतंच न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या ‘मेट गाला’ (Met Gala)ला हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरील (Red Carpet) तिचा स्टनिंग लूक खूप आकर्षक आणि सुंदर होता.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली फ्लोरल साडी आलियाने ‘मेट गाला २०२४’मध्ये परिधान केली होती. या डिझायनर साडीमध्ये आलिया सुरेख तर दिसत होतीच (Trolling). पण साडीव्यतिरिक्त आलीयाच्या आणखीन एका गोष्टीची चर्चा सोशल मीडियात रंगली (Social Viral). ती म्हणजे, आलियाने कानाच्यामागे लावलेली काजळाची तीट. आलियाच्या चाहत्यांना तिच्या फोटोमध्ये अशी तीट लावलेली दिसली असून, आता हा विषय चर्चेचा ठरला आहे(Alia Bhatt Puts 'Nazar Ka Kaala Tika' Behind Her Ear During Met Appearance, Photo Goes Viral ).

आलियाच्या 'टिका'वर सर्वांच्याच नजरा..

नजर लागू नये म्हणून, आपल्या भारतात लहान बाळांना तीट लावण्यात येते. तीट शक्यतो कानाच्या मागे लावतात. आलियाने देखील आपल्या कानाच्या मागे तीट लावलेली आहे. तिने ही तीट उजव्या कानाच्या मागे लावली असून, नेटकऱ्यांनी बरोबर स्पॉट केलं आहे.

जेवणाचं ताट वाढलं की तुम्ही आधी काय खाता? पाहा रोजच्या जेवणात पदार्थांचा योग्य क्रम

काहींनी केलं ट्रोल, तर काहींनी केली स्तुती

आलियाने लावलेल्या या काजळाच्या तीटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. एका युझरने 'तिने तीट लावलीच पाहिजे, कारण ती या साडीमध्ये खूप सुंदर दिसते आहे.' तर दुसऱ्याने 'जर तिने तीट लावली  तर काय झालं, आपण भारतीय आहोत आणि हे आपल्या देशात अगदी सामान्य आहे' असं म्हटलं आहे.

भारतात ५ पदार्थांवर बंदी, तरीही सर्रास होते विक्री! FSSAI सांगतत कॅन्सरचा धोका अधिक आणि..

तर ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, 'बुरी नजरवाले तेरा भी हो भला', तर दुसऱ्याने, 'हिला नक्की कोण नजर लावेल?' असं म्हणत ट्रोल केलं. तर, आणखीन एका युझरने, 'मला तर ही मोंजोलिका वाटतेयं' असं म्हणत ट्रोल केलं.

सोशल मिडीयावर दोन्ही तऱ्हेचे लोक असतात.  आलियाच्या या लूकचं जितकं कौतुक झालं तितकं ट्रोलिंगही झालं. पण आलिया आपल्या कामाने लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली एवढं मात्र नक्की.

टॅग्स :आलिया भटमेट गालासोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्राम