lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Alia bhatt : ...जेव्हा स्टुडंट ऑफ द इयरच्या ऑडिशनसाठी पोहोचली होती आलिया भट्ट; पाहा व्हायरल व्हिडीओ

Alia bhatt : ...जेव्हा स्टुडंट ऑफ द इयरच्या ऑडिशनसाठी पोहोचली होती आलिया भट्ट; पाहा व्हायरल व्हिडीओ

Alia bhatt : कोंकणा सेन शर्मा आणि रणबीर पहिल्यांदा कॉलेज पार्टीत भेटतात ते दृश्य तिने पुन्हा साकारले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 04:35 PM2022-01-07T16:35:44+5:302022-01-07T16:54:32+5:30

Alia bhatt : कोंकणा सेन शर्मा आणि रणबीर पहिल्यांदा कॉलेज पार्टीत भेटतात ते दृश्य तिने पुन्हा साकारले.

Alia bhatt : Alia bhatt soty audition ranbir kapoor wake up sid | Alia bhatt : ...जेव्हा स्टुडंट ऑफ द इयरच्या ऑडिशनसाठी पोहोचली होती आलिया भट्ट; पाहा व्हायरल व्हिडीओ

Alia bhatt : ...जेव्हा स्टुडंट ऑफ द इयरच्या ऑडिशनसाठी पोहोचली होती आलिया भट्ट; पाहा व्हायरल व्हिडीओ

आलिया भट्टने बॉलीवूडमध्ये नऊ वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला आहे, आणि आता ती सर्वात जास्त मानधन घेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 2012 मधील स्टुडंट ऑफ द इयर या तिच्या पहिल्या चित्रपटात ओव्हर-द-टॉप शनायाची भूमिका करण्यापासून, आलियाने डिअर जिंदगी आणि राजी यासह हार्ड हिटिंग चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. (Alia bhatt soty audition ranbir kapoor wake up sid)

आलियाचा हा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. आलियाने स्टुडंट ऑफ द इयरसाठी ऑडिशन दिली तेव्हा तिचा सध्याचा प्रियकर रणबीर कपूरच्या वेक अप सिड या चित्रपटातील ओळी वाचून तिनं सुरूवात केली. कोंकणा सेन शर्मा आणि रणबीर पहिल्यांदा कॉलेज पार्टीत भेटतात ते दृश्य तिने पुन्हा साकारले.

याशिवाय आलियाने सोनम कपूरच्या चित्रपटातील आय हेट लव स्टोरीजमधील बहारा या गाण्यावरही डान्स केला,ज्याने चित्रपट निर्माता करण जोहरचे लक्ष वेधून घेतले. एका जुन्या मुलाखतीची त्यांनी आठवण करून दिली, “मुंबईत ही तरुण मुलगी नवीन होती, नुकतीच शाळेतून बाहेर पडली होती, मला कल्पना होती की या मुलीमध्ये असे काहीतरी आहे जे फक्त भारताशी जोडले जाईल.” खरं तर, करण जोहरने नंतर आलियाला त्याची 'नवीन करीना' म्हटले.

झूमला दिलेल्या तिच्या पहिल्या मुलाखतीत, आलियाने सांगितले की, तिला तिच्या कुटुंबातील फिल्मी बॅकग्राऊंडच्या आधारे काम मिळवायचे नव्हते. करण जोहरने कौतुक म्हणून तिच्याकडे काय आहे असे विचारले असता, तिने उत्तर दिले की हा तिचा ‘फिल्मीनेस’ आहे. तिच्यातला आत्मविश्वास पाहून करणही थक्क झाला.  आलिया सांगते की, ''मी ऑडिशन दिली तेव्हा मी एक मोठा गोल बॉल होते आणि मी ऑडिशनमध्ये मटकत मटकत सर्व एक्सप्रेशन दिले.''

करण जोहरने 2012 मध्ये पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्या भूमिकेसाठी इतर 400 कलाकार होते ज्यांनी ऑडिशन दिले.  मुंबई आणि इतर शहरांतील ४०० हून अधिक मुलींची चाचणी केली. तेव्हा निरंजन अय्यंगारने मला सांगितले की महेश भट्ट यांची मुलगी आलिया  चित्रपटासाठी योग्य आहे. तेव्हा मी तिची एक एक्टिंग टेस्ट घेतली आणि मला खात्री पटली की तिच्याकडे हा एक्स फॅक्टर आहे जो चित्रपटासाठी काम करू शकतो,''

Web Title: Alia bhatt : Alia bhatt soty audition ranbir kapoor wake up sid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.