lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अफगाणिस्तानातून कसाबसा जीव वाचवत ती पळाली; अन् ३३ हजार फूट उंचावर दिला बाळाला जन्म

अफगाणिस्तानातून कसाबसा जीव वाचवत ती पळाली; अन् ३३ हजार फूट उंचावर दिला बाळाला जन्म

Afgani woman gave birth at 33 thousand feet flight : पालकांनी या बाळाचे नाव 'हवा' असे ठेवले आहे. या महिलेनं रेस्क्यू फ्लाइट (Birth On Rescue Plane) मध्ये आपल्या बाळाला जन्म दिला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:52 PM2021-08-30T12:52:13+5:302021-08-30T13:03:45+5:30

Afgani woman gave birth at 33 thousand feet flight : पालकांनी या बाळाचे नाव 'हवा' असे ठेवले आहे. या महिलेनं रेस्क्यू फ्लाइट (Birth On Rescue Plane) मध्ये आपल्या बाळाला जन्म दिला. 

Afgani woman gave birth at 33 thousand feet flight while rescue from kabul sankri | अफगाणिस्तानातून कसाबसा जीव वाचवत ती पळाली; अन् ३३ हजार फूट उंचावर दिला बाळाला जन्म

अफगाणिस्तानातून कसाबसा जीव वाचवत ती पळाली; अन् ३३ हजार फूट उंचावर दिला बाळाला जन्म

Highlights26 वर्षीय नूरी आपला ३० वर्षीय पती ताज मोहम हिंमतसोबत तुर्की एअरलाईन्सद्वारे यूकेला जात होती. विमानामध्ये लाल चादरीमध्ये गुंडाळलेल्या बाळाचा फोटो व्हायरल होत आहे.  त्याचे आई-वडील काबूलमध्ये राहत होते.

सध्या अफगाणिस्तानातील (Afganistan) लोकांची अवस्था खूपच दयनिय आहे. तालिबान्यांच्या भितीनं लोक लवकरात लवकर देश कसा सोडता येईल या प्रयत्नात आहेत. लोक आपलं घर, नोकरी, पैसे सगळं काही सोडून फक्त आपला जीव वाचवून इतर देशात पलायन (Rescue Of Afgani)  करत आहेत. जे लोक परदेशातून अफगाणिस्तानात आले होते ते मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत. अशा तणावाच्या वातावरणात एक महिला अफगाणिस्तानातून युकेला पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. या महिलेनं विमानामध्ये (Birth On Rescue Plane) आपल्या बाळाला जन्म दिला. 

26 वर्षीय नूरी आपला ३० वर्षीय पती ताज मोहम हिंमतसोबत तुर्की एअरलाईन्सद्वारे यूकेला जात होती.  दुबईमार्गे बर्मिंघमला जात असताना नूरीला अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यानंतर तिची प्रसूती 33 हजार फूट उंचीवर झाली. पालकांनी या बाळाचे नाव 'हवा' असे ठेवले आहे. त्यावेळी विमानात डॉक्टर नव्हते म्हणून केबिन क्रूकडून  बाळाची प्रसूती करण्यात आली. आता मूल आणि आई दोघेही सुरक्षित आहेत.

हे जोडपं काबूलवरून पळून आलं होतं

विमानामध्ये लाल चादरीमध्ये गुंडाळलेल्या बाळाचा फोटो व्हायरल होत आहे.  त्याचे आई-वडील काबूलमध्ये राहत होते. पण तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी आधी काबूल ते दुबई, नंतर दुबई ते यूके असा प्रवास केला. या दरम्यान, नूरीला प्रसूती वेदना झाल्या. तिने केबिन क्रूच्या मदतीने विमानात तिच्या तिसऱ्या मुलाला जन्म दिला. सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात मुलीच्या जन्मामुळे प्रत्येकाला नवीन जीवनाची आशा मिळाली.

सुरूवातीला प्रवाशी घाबरले

विमानात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता आणि नूरीच्या प्रसृती कळा वाढत चालल्या होत्या. त्यामुळे इतर प्रवाश्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं. पण टर्किश एअरलाईन्सच्या केबिन क्रू नं सगळ्यांना विश्वास घेऊन सांगितले की, सगळं व्यवस्थित होईल कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. 

त्यानंतर क्रू कडून महिलेची डिलिव्हरी करण्यात आली. त्यानंतर महिलेची स्थिती नॉर्मल झाल्यानं विमान प्रवास पुन्हा शांततेत सुरू झाला.  दरम्यान अफगाणिस्तानातून बचावलेल्या महिलेच्या विमानातील प्रसूतीची ही पहिली घटना नाही. यापूर्वी अमेरिकन लष्करी विमानातही एका महिलेने बाळाला जन्म दिला होता. मात्र, महिलेची ओळख लपवण्यात आली होती.

Web Title: Afgani woman gave birth at 33 thousand feet flight while rescue from kabul sankri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.