अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आता लवकरच सुरू होत आहे. आपल्याकडे धार्मिक, आध्यात्मिक दृष्ट्या या महिन्याला अतिशय महत्त्व आहे. पुरुषोत्तम मास म्हणूनच अधिकाचा महिना ओळखला जातो. या महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. ती सगळीकडे अगदी उत्साहाने पार पाडली जाते आणि जावयाला वाण दिले जाते. त्याचप्रमाणे आणखी एक परंपरा म्हणजे मुलीने आईची ओटी भरणे. हा एक प्रकारे आईचा सन्मान करणे, तिचे आदरआतिथ्य करण्याचाच एक भाग आहे. एरवी आपल्यासाठी आई कित्येक गोष्टी करते आणि आपण तिला त्यासाठी गृहित धरतो. यानिमित्ताने त्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते आणि आईचा योग्य तो मान राखला जातो. आता ही ओटी कशी भरायची असते ते पाहुया...
अधिक मासानिमित्त आईची ओटी कशी भरावी?
ओटी सामानात असणाऱ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत. त्यात प्रामुख्याने एक खण किंवा ब्लाऊज पीस असतो आणि तांदूळ असतात. आता त्यात बदल करायचा असल्यास आपण आईला तिच्या आवडीची एखादी छानशी साडी घेऊन देऊ शकतो.
फक्त १० मिनिटांत करा हिरव्यागार कैरीचं चटपटीत लोणचं, या लोणच्याशिवाय उन्हाळ्याची काय मजा...
याशिवाय त्यामध्ये सुपारी, बदाम, हळकुंड, खोबरे, रुपयांचे नाणे या वस्तूही घातल्या जातात. यात जर थोडा बदल करायचा असेल तर बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, अंजीर, मनुका असा सुकामेवा घ्या. त्याचे वेगवेगळे पॅकिंग करा आणि ते आईला द्या. शिवाय आई हे सगळे पदार्थ नियमितपणे खाईल याकडेही लक्ष द्या. जेणेकरून तिच्या तब्येतीचीही काळजी घेतली जाईल.
ओटीमध्ये एखादं फळ असावं. यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या आवडीची फळं निवडू शकता. यानिमित्ताने आईला आपल्याकडून काही पौष्टिक खायला दिले जाते.
१ ग्लास पाण्यात १ चमचा तूप घालून प्यायल्याने काय होतं पाहा- स्वत:मधला बदल पाहून चकित व्हाल
आईला काय आवडतं याचा विचार आपण खूप कमी वेळा करतो. आता अधिक मासाच्या ओटीच्या निमित्ताने आईच्या आवडीचे गोड पदार्थ करा आणि ते पदार्थ ओटी भरल्यानंतर तिला द्या. विकतचे गोड पदार्थ, मिठाई देण्यापेक्षा घरी केलेल्या पदार्थांची गोडी निश्चितच जास्त असते.
Web Summary : In Adhik Maas, honor your mother by filling her 'oti' with a saree, dry fruits, fruits, and homemade sweets. Show your appreciation and care for her well-being during this auspicious month.
Web Summary : अधिक मास में, अपनी माँ को साड़ी, सूखे मेवे, फल और घर की बनी मिठाई से ओती भरकर उनका सम्मान करें। इस शुभ महीने के दौरान उनके कल्याण के लिए अपनी प्रशंसा और देखभाल दिखाएं।