इंस्टंट नुडल्स हा प्रकार लहान मुले फार आवडीने खातात. विविध कंपन्या असे पॅकेट फूड विकतात. त्या कच्च्या खायलाही छान लागतात. अनेक जण खातात. तुम्हीही खात असाल. (A child died after eating raw noodles, parents should definitely read this before giving packet food to their children)कुडूमकुडूम खायला छान वाटतात. मुळात त्या नुडल्स कच्या काय आणि शिजवलेल्या काय खाल्यावर पोटाला त्रास होतोच कारण त्यात निव्वळ मैदा आणि मसाले असतात. भाज्या असल्या तरी त्या प्रक्रिया केलेल्या असतात. त्यामुळे असे पॅकेट फूड खाणे टळलेलेच बरे.
अशाच आवडीने नुडल्स खाणाऱ्या मुलासोबत एक धक्कादायक घटना घडली असून तिने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. इजिप्तमधील कॅइरो या ठिकाणी राहणार्या फक्त १३ वर्षांच्या हामझा नावाच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. मृत्यू कारण कळल्यावर पालकांच्या पायाखालची जमिनच सरकली. खेळून घरात परत आलेल्या हामझाने भूक लागली म्हणून तीन पॅकेट कच्चे नूडल्स पटापट खाल्ले. काही वेळाने त्याच्या पोटात दुखायला लागले. काही वेळातच त्याला उलट्या झाल्या आणि चक्करही येऊ लागली. घरच्या लोकांना बकाबक खाल्यामुळे पोट दुखते आहे असे वाटणे साहाजिकच होते. मात्र अचानक हामझा कोसळला आणि बोलायचाच थांबला. पालकांनी त्याला ताबडतोब दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी दिली.
प्राथमिक चौकशीत हामझाच्या शरीरावर कोणतीही बाह्य जखम आढळली नाही. त्यामुळे कच्च्या नूडल्सच्या अतिसेवनामुळेच हा अनपेक्षित मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. पोलिसांनी नूडल्स विकणाऱ्या दुकानदाराला अटक केली आहे. घटनास्थळावरून सापडलेली पॅकेट्स तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर खरे कारण स्पष्ट होईल. असे पोलिस म्हणाले. हामझाच्या घरच्यांचा मात्र विश्वासच बसत नाही की एका साध्या नूडल्सच्या पॅकेटमुळे त्यांच्या मुलाचा जीव जाऊ शकतो.
सोशल मिडियावर इतर पालकांनीही भीती व्यक्त करत असे प्रॉडक्ट्स बाजारात येताच कामा नयेत अशी मागणी केली. तुम्हीही जर असे पदार्थ फार आवडीने खात असाल तर एकदा नक्कीच विचार करा. लहान मुलांच्या आरोग्यसाठी तर हे पदार्थ नक्कीच चांगले नाहीत.