Join us  

7 year old boy saved his mothers life : शाब्बास पोरा! अचानक हार्ट अटॅक येऊन बेशुद्ध पडली आई; ७ वर्षांच्या लेकानं दिलं माऊलीला जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 6:15 PM

7 year old boy saved his mothers life : ही महिला हार्ट अटॅक आल्यानंतर बेशुद्ध झाली. अशावेळी काय करावे पटकन सुचणं कठीण असतं. पण या मुलानं प्रसंगावधान दाखवत आपल्या आईचे प्राण वाचवले.

(Image Credit- dainik bhaskar)

आई मुलाच्या नात्यातील प्रेम शब्दात व्यक्त करणं सोपं नाही. आई वडीलाच्या आठवणीनं तर कधीच तब्येतीच्या काळजीनं मुलांचा जीव कासावीस होतो.  मेरपर्यंत आईची साध लाभावी असं प्रत्येक घरातील मुलाला वाटत असतं. सोशल मीडियावर माय लेकाच्या नात्यातील प्रेम व्यक्त करणारी एक घटना व्हायरल होत आहे. एका 7 वर्षांच्या मुलाने आपल्या आईचा जीव वाचवला आहे. (7 year old boy saved his mothers life )

ही महिला हार्ट अटॅक आल्यानंतर बेशुद्ध झाली. अशावेळी काय करावे पटकन  सुचणं कठीण असतं. पण या मुलानं प्रसंगावधान दाखवत आपल्या आईचे प्राण वाचवले.  आईला त्रास होतोय हे पाहिल्यानंतर त्यानं तातडीने 108 वर कॉल करून रुग्णवाहिकेला बोलावलं. 5 मिनिटात रुग्णवाहिका पोहोचली आणि महिलेला सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या मुलाच्या आईला हार्ट अटॅक  आल्याचं  तपासणी दरम्यान समोर आलं. (A 7-year-old boy saved his mother's life due to a heart attack)

मुलाच्या हुशारीनं डॉक्टरही अवाक् झाले

आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर या मुलानं दाखवलेली हूशारी पाहून डॉक्टरही अवाक् झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार  जर १ तास जरी उशिर झाला असला तर  या महिलेचा जीव जाण्याची शक्यता होती. राहुलच्या म्हणण्यानुसार एकदा त्याच्या बहिणीने सांगितलं होतं की, ''कोणाचीही तब्येत बिघडली तर 108 नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावता येते. हे लक्षात ठेवून मी आईची तब्येत बरी नसल्याची माहिती दिली.''

कंगवा फिरवताच खूप केस हातात येतात? दाट, लांबसडक केसांसाठी वापरा हा खास हेअर मास्क

40 वर्षीय मंजू पांडे उत्तर प्रदेशातील अयोध्याची राहणारी आहे. ती आपल्या पती-मुलासह संजय नगरमध्ये वास्तव्यास आहे. मंजू पांडेनं सांगितले की, ''जेव्हा मला जाग आली तेव्हा मी रुग्णालयात होते. बुधवारी दुपारी मला उलट्या सुरू झाल्या आणि खूप घाबरल्यासारखं वाटत होतं. मी कधी बेशुद्ध झाले हे मला कळलेच नाही. अशात 7 वर्षांचा मुलगा राहुलने तातडीने 108 वर फोन करून रुग्णवाहिका बोलावली.''

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाप्रेरणादायक गोष्टीउत्तर प्रदेश