Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोजचा स्वंयपाक करताना ७ स्मार्ट टिप्स वापरा; वेळ वाचेल-सिलेंडरही जास्त दिवस पुरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:32 IST

7 Kitchen Tips : स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

स्वंयपाकघर हा आपल्या घरातील महत्वाचा भाग असतो. कारण स्वयंपाक करण्यात बराचसा वेळ जातो. किचनमध्ये काम करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं ज्यामुळे अन्न पौष्टीक आणि उत्तम बनतं. स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. स्वंयपाकघरातील काम सोपं करणाऱ्या सोप्या टिप्स पाहूया. ज्या तुम्हाला रोज उपयोगी ठरतील. (7 Things You Should Keep In Mind While Cooking In Kitchen)

किचनमध्ये काम करताना ७ गोष्टी लक्षात ठेवा (7 Kitchen Tips And Tricks)

 १) शिळं अन्न फेकू द्या

 उन्हाळ्याच्या दिवसांत अन्न लवकर खराब होतं शिळं अन्न जास्त दिवस फ्रिजमध्येही ठेवू नका. थोडंच गरजेपुरता जेवण करा जेणेकरून वाया जाणार नाही. 

२) भाज्यांची स्वच्छता

 फळं आणि भाज्या  विकत घेतल्यानंतर लगेच गरम पाण्याच्या बादलीत घाला आणि स्वच्छ धुवून घ्या. हलक्या हातानं रगडून  कमीत कमी २० मिनिटं भिजवून ठेवा. फळं आणि भाज्या ताज्या पाण्यानं व्यवस्थित धुवा आणि स्वच्छ कापडानं पुसून मग ठेवा.

३) स्वयंपाकघराची स्वच्छता

जेवण बनवल्यानंतर गॅस स्टोव्ह स्वच्छ करा.  फ्रिज दर आठवड्याला साफ करा. धूळ आणि चिकट थर भांड्यांवर जमा  होतो. ज्यामुळे भांडी जास्त चिकट होतात. जर ट्रॉली खराब झाल्या असतील तर महिन्यातून एकदा साफ-सफाई नक्की करा.

 ४) स्मार्ट पद्धत

 गॅस सुरू करण्याआधीच सर्व भाज्या चिरून घ्या आणि मसाले जवळ  ठेवा. ज्यामुळे अन्न जळत नाही. ज्या भांड्यात स्वयंपाक करायचा असाल तर त्यानुसार भांड्यांची निवड करा. नॉन स्टिक भांड्यांसाठी लाकूड किंवा सिलिकॉन चमच्यांचा वापर करा.

५) गरम वस्तू हाताळण्याची पद्धत

गरम भांडी किंवा कढई पकडताना नेहमी कोरड्या कापडाचा किंवा पकडचा वापर करावा. ओले कापड गरम भांड्याला लागल्यास वाफेमुळे हात भाजण्याची शक्यता असते.

६) प्रेशर कुकर वापरताना काय खबरदारी घ्याल

प्रेशर कुकर वापरताना त्याची शिट्टी आणि रबर गॅस्केट सुस्थितीत असल्याची खात्री करावी. कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेल्याशिवाय त्याचे झाकण उघडण्याची घाई करू नये. तसेच, गरम तेल किंवा उकळते पाणी हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगावी.

७) ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन

किचनमधील स्वच्छता ही आरोग्याची पहिली पायरी आहे. काम करत असताना ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र कचरा कुंड्या असाव्यात. भाज्यांचे देठ, फळांच्या साली असा ओला कचरा जास्त वेळ किचनमध्ये साठवून ठेवू नये, कारण त्यामुळे माश्या आणि झुरळांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : 7 Smart Kitchen Tips for Time Saving and Longer Cylinder Life

Web Summary : Follow these kitchen tips for efficiency: Manage food waste, clean produce thoroughly, maintain kitchen hygiene, prep smartly, handle hot items carefully, use pressure cookers safely, and manage wet and dry waste.
टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स