फ्रिजचा वापर आता घरोघरी केला जातो. पुर्वी लोकांकडे फ्रिज असायचे, पण त्यात मोजकेच पदार्थ ठेवले जायचे आणि फ्रिजचा बराचसा भाग रिकामाच असायचा. पण आता मात्र फ्रिजमध्ये अक्षरश: कोंबून कोंबून पदार्थ बसवले जातात. फ्रिजमध्ये एकेक गोष्ट साठवून ठेवताना आपण त्या फ्रिजची क्षमताही लक्षात घेत नाही. तुम्ही फ्रिजमधे चुकीच्या पद्धतीने पदार्थ ठेवले आणि ते गरजेपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवले तर ते पदार्थ नक्कीच खराब होतात. पण ते आपल्या लक्षातही येत नाही. आपण असे खराब पदार्थ खातो आणि मग तब्येत बिघडते (4 rules about the use of refrigerator). म्हणूनच फ्रिज वापरताना काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्या.(how to use refrigerator?)
फ्रिज वापरण्याचे ४ महत्त्वाचे नियम
फ्रिजचा वापर योग्य पद्धतीने कसा केला पाहिजे, फ्रिजमध्ये कोणती वस्तू कुठे ठेवायला हवी, फ्रिजमधलं तापमान किती असावं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी dr.shalinisinghal या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले नियम पुढीलप्रमाणे..
केसांसाठी राईस वाॅटर कसं तयार करायचं- कसं लावायचं? बघा पद्धत- केसांचे सगळे प्रॉब्लेम गायब
१. फ्रिजचं तापमान योग्य असणं गरजेचं आहे. फ्रिजचं तापमान व्यवस्थित सेट केलेलं असेल तर अन्नपदार्थांवर बॅक्टेरिया वाढत नाहीत. त्यामुळे फ्रिजचं तापमान ४ डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षाही कमी असावं.
२. फ्रिजमध्ये कोणते पदार्थ कुठे ठेवावे याचेही नियम असतात. कारण संपूर्ण फ्रिजमधलं तापमान एकसारखं नसतं. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ फ्रिजच्या मध्यभागी ठेवावे. इतर अन्नपदार्थ फ्रिजच्या सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये ठेवावे. तिथे तापमान कमी असल्याने अन्नपदार्थ खराब होत नाहीत.
भाज्या तसेच फळं फ्रिजच्या सगळ्यात खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवावे. तसेच चटण्या, लोणचे, सॉसेस, मसाले असे सगळे पदार्थ फ्रिजच्या दरवाज्यामध्ये ठेवावे.
३. फ्रिजमध्ये अन्नपदार्थ ठेवण्याचा सगळ्यात मुख्य नियम म्हणजे कोणताही पदार्थ फ्रिजमध्ये उघडा ठेवू नये. सगळे पदार्थ झाकून ठेवावे.
घरच्याघरी फेशियल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत- ट्राय करून पाहा, दसऱ्याच्या दिवशी चेहरा चमकेल
पदार्थ उघडेच ठेवल्याने एकाचा वास दुसऱ्याला लागू शकतो किंवा एका खराब पदार्थामुळे इतर पदार्थही खराब होऊ शकतात.
४. कोणताही पदार्थ जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवू नये. जो पदार्थ तुम्ही आधी फ्रिजमध्ये ठेवला असेल तो आधी संपवून टाका आणि मग त्यानंतरच दुसरा पदार्थ त्यात ठेवा.