Join us

मळकट-चिकट टाईल्समुळे किचनची शोभा कमी झाली? लिंबाचे २ उपाय, मेहनत न घेता-टाईल्स होतील चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2023 16:17 IST

3 Ways to Remove Stains from Tiles : आली दिवाळी, सफाईची केली तयारी? किचनच्या कळकट-चिकट टाईल्स साफ करण्यासाठी २ सोपी ट्रिक, सफाई होईल सोपी

जेवण तयार केल्यानंतर बऱ्याच महिला किचन ओटाची सफाई त्याच वेळीस करतात. पण किचनचे टाईल्स दररोज साफ करत नाहीत. किचनचे टाईल्स बराच काळ साफ न केल्यामुळे चिकट-कळकट होतात. सध्या अनेकांच्या घरात दिवाळीची साफसफाई सुरु आहे. संपूर्ण घराची सफाई केल्यानंतर, तिथून पुढे फराळ व इतर गोष्टींची तयारी केली जाते.

इतर खोलीच्या तुलनेत किचनची सफाई लवकर होत नाही. मुख्य म्हणजे किचनच्या टाईल्सवरील मळकट-हट्टी डाग लवकर निघत नाही. जर मेहनत न घेता, किचनच्या टाईल्सवरील तेलकट-चिकट डाग काढायचे असतील तर,  ५ गोष्टींचा वापर करून पाहा. यामुळे कळकट झालेले किचनचे टाईल्स काही मिनिटात साफ होतील, यासह नव्यासारखे दिसतील(3 Ways to Remove Stains from Tiles).

व्हिनेगर, मीठ, बेकिंग सोडा

किचन टाईल्स स्वच्छ करण्यासाठी आपण घरगुती उपाय तयार करू शकता. यासाठी एका ग्लासमध्ये अर्धा कप व्हिनेगर, अर्धा कप पाणी, २ चमचे मीठ व बेकिंग सोडा घालून मिक्स करा. तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा, व मिश्रण टाईल्सवर शिंपडा. ५ मिनिटानंतर स्क्रबरने टाईल्स घासून काढा. यामुळे मेहनत न घेता, टाईल्सचे हट्टी-चिकट निघून जातील.

किचन सिंक सतत तुंबते? बेकिंग सोड्याचा १ भन्नाट उपाय, प्लंबरला बोलावण्यची गरजही पडणार नाही..

ब्लीच आणि लिंबाचा वापर

किचन टाईल्स स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबू आणि ब्लीचचा देखील वापर करू शकता. यासाठी एका कपमध्ये दोन चमचे ब्लीच आणि समप्रमाणात लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करा. तयार मिश्रणात जुने कापड बुडवून टाईल्स पुसून काढा. या ट्रिकमुळे टाईल्स सहज साफ होतील. मात्र, टाईल्स साफ करताना हातात हातमोजे घालायला विसरू नका.

कतरिनाला 'टॉवेल फाईट'मध्ये टफ पंगा देणारी 'ती' अभिनेत्री नक्की कोण? तिची एवढी सोशल मीडियात चर्चा का?

लिंबू आणि गरम पाणी

लिंबाच्या मदतीने टाईल्स काही मिनिटात चकाचक स्वच्छ होतील. यासाठी एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. नंतर टाइल्सवर स्प्रे करा आणि स्क्रबरने घासून काढा. यामुळे टाईल्स नव्यासारखे चमकतील.

टॅग्स :स्वच्छता टिप्सदिवाळी 2022किचन टिप्ससोशल व्हायरल