कोण, कधी, कोणाच्या, कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक हटके लव्हस्टोरी आता समोर आली आहे. जपानमधील २३ वर्षीय तरुण त्याच्या क्लासमेटच्या ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात पडला. वयात लक्षणीय फरक असूनही, दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या नात्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर हे कपल व्हायरल झालं असून त्यांची जगभरात चर्चा रंगली आहे.
जपानमधील २३ वर्षीय कोफू आणि ८३ वर्षीय ऐको एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत. कोफूने स्पष्ट केलं की, तो आणि ऐकोची नात एकाच वर्गात आहे. क्लासमेटच्या घरी भेटायला गेला असता त्याची ऐकोशी भेट झाली आण आणि तो पहिल्याच भेटीत प्रेमात पडला. ऐको देखील कोफूच्या उर्जेने आणि नम्र स्वभावाने खूप प्रभावित झाली. ती म्हणाली, "मी यापूर्वी कधीही इतका उत्साही माणूस पाहिला नव्हता. मी त्याच्याकडे आकर्षित झाली."
कोफूच्या क्लासमेटने डिस्नेलँडला जाण्याचा प्लॅन केला तेव्हा खऱ्या अर्थाने हे नातं सुरू झाले. नंतर, नात काही कारणास्तव निघून गेली, फक्त कोफू आणि ऐको पार्कमध्ये राहिले. कोफूने ऐकोसमोर तिच्या भावना कबूल केल्या. हे नातं बराच काळ लपून राहिलं, परंतु जेव्हा कुटुंबांना समजलं तेव्हा दोन्ही कुटुंबांनी ते स्वीकारलं. आता हे कपल एकत्र राहतं.
ऐको म्हणते की कोफू कामावर गेल्यावर तिला थोडं एकटं वाटतं, परंतु त्याच्यासाठी स्वयंपाक केल्याने तिला आनंद मिळतो. ऐकोकडे एक मोठं बॉटनिकल गार्डन होतं. तिचं दोनदा लग्न झालं आहे, तिला एक मुलगा, एक मुलगी आणि पाच नातवंडं आहेत. घटस्फोटानंतर ती तिच्या मुलासोबत राहत होती. ती निरोगी जीवनशैली जगते आणि नेहमीच चांगले कपडे घालते. म्हणूनच ती तिच्या वयापेक्षा खूपच लहान दिसते.
