Bathing Mistake to Avoid: आंघोळ करणं दैनंदिन कामांपैकी एक महत्वाचं काम असतं. रोज सकाळी झोपेतून उठवल्यावर अंगावरून पाणी घेतल्यानं आळस तर निघून जातोच, सोबतच शरीरावरील बॅक्टेरिया, कीटाणू सुद्धा दूर होतात. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी होतो. आंघोळ करण्याचे काही नियम असतात. काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. असं केलं नाही तर जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. काही अनपेक्षित दुर्घटना याला कारणीभूत ठरतात.
MBBS डॉक्टर रिचा तिवारी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहेत. ज्यात त्यांनी आंघोळीसंबंधी एका धक्कादायक घटनेची माहिती दिली. पाहुयात काय आहे ही घटना.
व्हिडिओत डॉक्टरांनी सांगितलं की, काही दिवसांआधी त्यांच्याकडे एक १८ वर्षीय तरूणी बेशुद्धावस्थेत आणण्यात आलं होतं. सोबत तरूणीची आहे होती. आईनं सांगितलं की, मुलगी आंघोळ करत होती. रविवार असल्यानं आरामात आंघोळ करत असल्याचा त्यांनी विचार केला. पण बराच वेळ होऊनही दरवाजा उघडला नाही तर दरवाजा तोडावा लागला. मुलगी बाथरूममध्ये जमिनीवर पडली होती. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मुलीचा हार्ट रेट आणि बीपी नॉर्मल होता. पण रक्तात कार्बोक्सीहीमोग्लोबिनचं प्रमाण खूप वाढलं होतं.
डॉक्टर सांगतात की, तरूणीसोबत हे कार्बन मोनोक्साइड (CO) मुळे झालं होतं. कार्बन मोनोक्साइड एक गंधहीन, रंगहीन आणि घातक गॅस असतो. हा गॅस बाथरूममधील गॅस गीझरमधून येत होता आणि त्यामुळे बाथरूममधील ऑक्सीजन लेव्हल कमी झाली होती.
डॉक्टरांनुसार, अनेकदा बंद बाथरूमध्ये गॅस गीझर जळाल्याने हा गॅस हळूहळू जमा होऊ लागतो आणि व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा तर ही बाब लक्षात येत नाही आणि व्यक्ती थेट बेशुद्ध होते. जर वेळेवर उपचार मिळाले नाही तर जीवही जाऊ शकतो.
काय काळजी घ्याल?
- डॉक्टरांनी सांगितलं की, जर आपल्या बाथरूममध्येही गॅस गीझर असेल तर बाथरूममध्ये एक्झॉक्सट फॅन किंवा खिडकी असणं गरजेचं आहे. जेणेकरून गॅस लीक झाल्यास बाहेर निघेल.
- बाथरूममध्ये गीझर आणि शॉवर एकत्र असू नये. प्रयत्न करा की, गीझर बाथरूमच्या बाहेर कसं लावता येईल.
- बाजारात CO गॅस डिटेक्टर मिळतात. जेव्हा या गॅसची लेव्हल वाढते तेव्हा हे डिटेक्टर अलार्म देतात.
- बाथरूममध्ये धोके टाळण्यासाठी आंघोळ लवकर आटपा, खूप जास्त वेळ बाथरूममध्ये घालवू नका.
गॅस गीझर एक महत्वाचं साधन आहे. पण याचा वापर करत असताना योग्य ती काळजी घेणंही महत्वाचं ठरतं. वेळोवेळी गीझर चेक केलं पाहिजे. कारण गीझरमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये दरवर्षी अनेकांचा जीव जातो. अशात याकडे दुर्लक्ष करू नका.