Lokmat Sakhi >Social Viral > ११६ वर्षांच्या आजींनी सांगितलं दीर्घायुष्याचं गुपित; ५ गोष्टींची काळजी घ्या, १०० वर्ष जगाल

११६ वर्षांच्या आजींनी सांगितलं दीर्घायुष्याचं गुपित; ५ गोष्टींची काळजी घ्या, १०० वर्ष जगाल

116 Years Old Women Reveals Her Longevity Mantra : गिनिज वर्ल्ड रेकॉड्समध्ये याचवर्षी ३० एप्रिलला एथेलचा जगातील सगळ्यात वयस्कर असलेल्या  महिलेचा किताब देण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:55 IST2025-08-26T15:24:48+5:302025-08-26T15:55:31+5:30

116 Years Old Women Reveals Her Longevity Mantra : गिनिज वर्ल्ड रेकॉड्समध्ये याचवर्षी ३० एप्रिलला एथेलचा जगातील सगळ्यात वयस्कर असलेल्या  महिलेचा किताब देण्यात आला.

116 Years Old Women Reveals Her Longevity Mantra world Oldest Living Person | ११६ वर्षांच्या आजींनी सांगितलं दीर्घायुष्याचं गुपित; ५ गोष्टींची काळजी घ्या, १०० वर्ष जगाल

११६ वर्षांच्या आजींनी सांगितलं दीर्घायुष्याचं गुपित; ५ गोष्टींची काळजी घ्या, १०० वर्ष जगाल

निरोगी दीर्घायुष्यासाठी लोक हेल्दी लाईफस्टाईल आणि चांगलं खाणंपिणं, रेग्युलर व्यायाम करतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या म्हणण्यांनुसार दीर्घकाळ तब्येत चांगली ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. याव्यतिरिक्त काही गोष्टी तुमचं आयुष्य एकदम उत्तम बनवू शकतात. (Old Women Reveals Her Longevity)

ब्रिटनची रहिवासी असलेली एथेल कॅटरहम जिचे वय ११६ आहे ती सगळ्यात वयस्कर महिला आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉड्समध्ये याचवर्षी ३० एप्रिलला एथेलचा जगातील सगळ्यात वयस्कर असलेल्या  महिलेचा किताब देण्यात आला. या आजींनी अलिकडेच आपल्या दीर्घायुष्याचे सिक्रेट सांगितले आहे. (116 Years Old Women Reveals Her Longevity Mantra world Oldest Living Person)

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार एथेल कॅटरहमचा जन्म २१ ऑगस्ट १९०९मध्ये झाला. त्यावेळी राजा एडवर्ड सप्तमचे राज्य होते. एथेल आठ भावंडांपैकी एक होती. त्याचे लहानपण गरिबी, संघर्ष आणि कौटुंबिक समस्यांनी घेरलेले होते.

एथेलचं वैवाहिक आयुष्यही इतक सोपं नव्हतं. १९७६ मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. नंतर दोन्ही मुलांनीही जगाला निरोप दिला. इतक्या कठीण परिस्थितीतही त्यांनी जगण्याची उमेद सोडली नाही. काही वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात कोविड महामारी होती तेव्हा एथेल ११० वर्षांच्या होत्या त्यांनाही कोव्हीड झाला होता.

एथेल यांच्या दीर्घायुष्याचं सिक्रेट काय आहे?

एथेल कॅटरहमनं आपल्या निरोगी दीर्घायुष्याचं सिक्रेट सोप्या शब्दात सांगितलं आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार कधीही कोणाशी वाद घालू नका. शांततापूर्वक सगळं ऐका. आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना हो म्हणायला हवं.  याशिवाय मॉडरेशनचं पालन करायला हवं. नेहमी सकारात्मक मानसिकता ठेवायला हवी. ताण-तणावाला दूर ठेवावं, जेव्हा त्यांनी १८ वर्षांच्या वयात भारतात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या ब्रिटिश परीवारासोबत नॅनी बनून भारतात आल्या होत्या. त्याचं म्हणणं होतं की आयुष्य मन भरून जगण्यासाठी असतं.

जीवनात संघर्ष आणि एकटेपणा असतानाही मानसिक आरोग्य चांगले ठेवावे आणि हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायला हवी. यामुळे आयुष्यात पुढे जाण्यासाठी मोटिव्हेशन मिळेल. जीवन जगणं आणि नकारात्मकतेपासून वाचणं गरजेचं आहे. यामुळे फक्त ताण-तणाव कमी होत नाही तर  मानसिक आणि शारीरिक स्वरूपात निरोगी राहण्यास मदत होते.  ज्यामुळे फक्त शारीरिक काळजी, सकारात्मक विचार आणि भावनात्मक संतुलन गरजेचं आहे.

Web Title: 116 Years Old Women Reveals Her Longevity Mantra world Oldest Living Person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.