Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Shopping > Kitchen Tips: खिशाला कात्री न लावता जुनं किचन करा मॉडर्न; फॉलो करा 'या' ५ सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips: खिशाला कात्री न लावता जुनं किचन करा मॉडर्न; फॉलो करा 'या' ५ सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips: कमी जागा आणि जुनी रचना? या सोप्या बदलांमुळे तुमच्या किचनला मिळेल रिनोव्हेटेड लूक; कसा ते जाणून घ्या. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:19 IST2026-02-02T16:17:09+5:302026-02-02T16:19:54+5:30

Kitchen Tips: कमी जागा आणि जुनी रचना? या सोप्या बदलांमुळे तुमच्या किचनला मिळेल रिनोव्हेटेड लूक; कसा ते जाणून घ्या. 

Kitchen Tips: Make an old kitchen modern without breaking the bank; Follow these 5 easy tricks | Kitchen Tips: खिशाला कात्री न लावता जुनं किचन करा मॉडर्न; फॉलो करा 'या' ५ सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips: खिशाला कात्री न लावता जुनं किचन करा मॉडर्न; फॉलो करा 'या' ५ सोप्या ट्रिक्स

बऱ्याचदा आपण घराचे हॉल किंवा बेडरूम सजवण्याकडे लक्ष देतो, पण किचनच्या (स्वयंपाकघर) जुन्या रचनेत बदल करणे आपल्याला खर्चिक आणि कठीण वाटते. मात्र, नूतनीकरणाचा (Renovation) मोठा खर्च न करताही तुम्ही तुमच्या जुन्या किचनला स्टायलिश आणि मॉडर्न लुक देऊ शकता.

नूतनीकरणाशिवाय किचनला द्या नवा लुक:

१. वॉलपेपरचा वापर करा: किचनच्या भिंतींना रंग देण्याचे काम वेळखाऊ आणि खर्चिक असते. त्याऐवजी तुम्ही आकर्षक डिझाइनचे वॉलपेपर वापरू शकता. हे लावणे सोपे असते, याला कोणाच्या मदतीची गरज लागत नाही आणि यामुळे भिंतींना त्वरित नवा लुक मिळतो. तसेच रंगाचा उग्र वास किंवा घाण होण्याचा त्रासही उरत नाही.

२. ओपन शेल्फ आणि हँगिंग रॅक्स: भिंतीवर ओपन शेल्फ किंवा हँगिंग रॅक्स लावल्याने किचन क्लासी दिसते. तुम्ही या रॅक्सवर कप-बश्या किंवा काही शोभेच्या वस्तू सजवून ठेवू शकता. हे रॅक्स तुम्ही ऑनलाइन मागवून स्वतःच भिंतीवर फिट करू शकता.

३. लायटिंगमध्ये बदल करा: किचनमध्ये केवळ एक मोठा बल्ब लावण्याऐवजी छोट्या छोट्या एलईडी लाइट्सचा वापर करा. तुम्ही किचनमध्ये छोटे छोटे कंदील किंवा हँगिंग लाइट्स लटकवू शकता, ज्यामुळे किचनला 'अँटिक' आणि प्रिमियम लुक मिळेल.

४. क्लोज्ड बास्केटचा वापर: जर तुमच्या किचनमध्ये कॅबिनेट्स (कपाटे) नसतील, तर सामान विखुरलेले दिसते. अशा वेळी 'विकर बास्केट' किंवा झाकण असलेल्या बास्केटचा वापर करा. यामुळे सामान व्यवस्थित राहते आणि किचन नीटनेटके दिसते.

५. अनावश्यक सामान हटवा: किचन जितके रिकामे आणि सुटसुटीत असेल, तितके ते अधिक सुंदर दिसते. ज्या वस्तूंचा रोज वापर होत नाही, त्या स्टोअर रूममध्ये हलवा. किमान सामानामुळे किचन मॉडर्न वाटते.

Web Title : पुराने किचन को कम खर्च में बनाएं मॉडर्न: 5 आसान उपाय

Web Summary : बिना ज़्यादा खर्च किए अपने पुराने किचन को आधुनिक बनाएं। वॉलपेपर, खुली शेल्फ और स्मार्ट लाइटिंग का उपयोग करें। टोकरियों से व्यवस्थित करें और जगह खाली करें, कम बजट में स्टाइलिश बदलाव करें।

Web Title : Modernize your old kitchen on a budget: 5 easy tricks.

Web Summary : Give your old kitchen a modern look without expensive renovations. Use wallpaper, open shelves, and smart lighting. Organize with baskets and declutter for a stylish, budget-friendly update.