Lokmat Sakhi >Shopping > लालबुंद रंगाला भुलून टरबूज घेणं पडेल महागात-  इंजेक्शन देऊन  पिकवलेलं टरबूज ओळखण्यासाठी ४ टिप्स

लालबुंद रंगाला भुलून टरबूज घेणं पडेल महागात-  इंजेक्शन देऊन  पिकवलेलं टरबूज ओळखण्यासाठी ४ टिप्स

How To Check If Watermelon Is Injected With Colour: फक्त लाल रंगाकडे पाहून टरबूज खरेदी करू नका. इंजेक्शन देऊन कृत्रिमपणे ते पिकवलेलं असू शकतं..(How To Select A Naturally Ripe Watermelon?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 17:53 IST2025-03-05T17:52:22+5:302025-03-05T17:53:45+5:30

How To Check If Watermelon Is Injected With Colour: फक्त लाल रंगाकडे पाहून टरबूज खरेदी करू नका. इंजेक्शन देऊन कृत्रिमपणे ते पिकवलेलं असू शकतं..(How To Select A Naturally Ripe Watermelon?)

How to check if Watermelon is injected with colour, How to Identify Injected Watermelon, How To Select A Naturally Ripe Watermelon, 4 Tips to Pick The Perfect Ripe Watermelon | लालबुंद रंगाला भुलून टरबूज घेणं पडेल महागात-  इंजेक्शन देऊन  पिकवलेलं टरबूज ओळखण्यासाठी ४ टिप्स

लालबुंद रंगाला भुलून टरबूज घेणं पडेल महागात-  इंजेक्शन देऊन  पिकवलेलं टरबूज ओळखण्यासाठी ४ टिप्स

Highlightsतुम्ही ज्या लाल रंगाला भुलून टरबूज खरेदी करत आहात ते एक केमिकल असून असं केमिकलयुक्त फळ खाणं आरोग्यासाठी घातकच आहे..

मार्च महिना उजाडला आणि बाजारात सगळीकडेच मोठमोठ्या आकाराचे बाहेरून हिरवेगार आणि आतून लालबुंद असणारे टरबूज दिसू लागले आहेत. आता महाराष्ट्राचा काही भाग सोडला तर उर्वरित ठिकाणी हे फळ फक्त उन्हाळ्यातच खायला मिळतं. त्यामुळे ते बाजारात येताच टरबूजप्रेमी त्याची भरभरून खरेदी करतात. पण हल्ली सगळ्याच गोष्टींमध्ये जशी भेसळ होत आहे तशीच या फळाच्या बाबतीतही होताना दिसत आहे. ग्राहकांना आकर्षित करायचं तर टरबूज दिसायला लालबुंद हवं (4 Tips to Pick The Perfect Ripe Watermelon). ही गोष्ट विक्रेत्यांनी पक्की हेरली असून आता चक्क टरबूजाला एक लाल रंगाचं इंजेक्शन दिलं जातं (How to Identify Injected Watermelon). त्यामुळे तुम्ही ज्या लाल रंगाला भुलून टरबूज खरेदी करत आहात (How To Select A Naturally Ripe Watermelon?) ते एक केमिकल असून असं केमिकलयुक्त फळ खाणं आरोग्यासाठी घातकच आहे..(How to check if Watermelon is injected with colour?)

 

टरबूज खरेदी करताना काेणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या?

१. कोणत्याही फळाचा रंग त्या फळाच्या सगळ्या भागात एकसारखा नसतो. त्यामुळे जे टरबूज सगळीकडून हिरवगार आहे, ज्यावर कुठेही पिवळट भाग नाही असं टरबूज घेऊ नका. ते इंजेक्शन देऊन पिकवलेलं असू शकतं.

उन्हाळ्यात जास्वंदाला फुलं येणं कमी होतं? सोपे घरगुती उपाय, पानांपेक्षाही फुलंच जास्त दिसतील..

२. टरबुजाचा एक छोटासा तुकडा घ्या आणि तो तुकडा पाण्यामध्ये टाका. जर काही वेळाने पाण्याला गुलाबी रंग आलेला दिसला तर ते टरबूज इंजेक्शन देऊन कृत्रिमपणे लाल करण्यात आलेलं आहे. 

 

३. जे टरबूज गोड आहे, ज्याला रंगसुद्धा लाल आहे पण बिया पांढरट आहेत असं टरबूज घेणं टाळा. ते कृत्रिमपणे पिकवलेलं असतं. पुर्णपणे पिकलेल्या टरबुजाच्या बिया काळपट, चॉकलेटी असतात.

ॲनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी फक्त लोहयुक्त पदार्थ खाऊन उपयोग नाही, त्यासोबतच 'हा' आहार घ्या

४. टरबुजाचे देठ पाहूनही त्याची परिक्षा करता येते. ज्या टरबुजाचे देठ हिरवे असूनही ते आतून लालबुंद असते असे टरबूज कृत्रिमपणे पिकवलेले असू शकते. कारण जे टरबूज नैसर्गिकरित्या पुर्णपणे पिकलेले असते त्या टरबुजाचे देठ वाळलेले असते.
 

Web Title: How to check if Watermelon is injected with colour, How to Identify Injected Watermelon, How To Select A Naturally Ripe Watermelon, 4 Tips to Pick The Perfect Ripe Watermelon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.