Join us

कुकर जुना झाला-नवीन घ्यायचाय? 3 लीटर क्षमतेच्या कुकरचे ५ पर्याय, कमी बजेटमध्ये आणा मस्त कुकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:26 IST

Best Pressure Cooker With Price Shopping Link : . या कुकरची बिल्ड क्वालिटी उत्तम असते. दीर्घकाळ टिकतात.

कुकरच्या शिट्ट्या नीट होत नाहीत. अन्न करपतं अशा अनेकांच्या तक्रारी असतात. पण वर्षानुवर्ष एकच कुकर वापरला तर तो व्यवस्थित काम करत नाही (Cooking Hacks). ३ लीटर क्षमतेच्या कुकरमध्ये तुम्ही स्वयंपाक व्यवस्थित करू शकता. ३ ते ४ जणांसाठी उत्तम स्वंयपाक यात होईल (Pressure Cooker In Lowest Budget With 3 Litre Capacity). यात लवकर अन्न तयार होतं. हे प्रेशर कुकर तुम्ही इंडक्शनवरही वापरू शकता. या कुकरची बिल्ड क्वालिटी उत्तम असते. दीर्घकाळ टिकतात. कमीत खर्चात तुम्हाला कोणते कुकर घेता येतील ते समजून घेऊया. (Best Pressure Cooker With 3 Litre Capacity)

1) प्रेसटिज स्वाच एल्युमिनी प्रेशर कुकर (Prestige Svachh Aluminium Pressure Cooker)

हा कुकर 'Svachh' डिझाइनसह येतो, ज्यामुळे झाकणामधून बाहेर पडणारी वाफ आणि अन्न सांडत नाही. याला डिशवॉशर सुरक्षित असे झाकण आहे आणि ते एल्युमिनियमपासून बनलेले आहे. Flipkart, Amazon India आणि Prestige च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. 1800 ते 2300 या रेंजमध्ये तुम्हाला हा कुकर मिळेल.

2) हाऊकिन्स कन्टुरा प्रेशर कुकर (Hawkins Contura Pressure Cooker)

Hawkins हा प्रेशर कुकरमधील एक लोकप्रिय ब्रँड आहे. 'Contura' मॉडेल त्याच्या कर्व्हड बॉडीसाठी ओळखले जाते, ज्यामुळे ढवळणे सोपे जाते. हा कुकर एल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टीलमध्ये उपलब्ध आहे. 1000 ते 1500 रूपयांत तुम्हाला कुकर मिळेल.

3) पिजन स्टोव्हक्राफ्ट एल्युमिनियम प्रेशर कुकर (Pigeon By Stovekraft Aluminium Pressure Cooker)

हा एक परवडणारा आणि विश्वासार्ह पर्याय आहे. कुकरमध्ये बाह्य झाकण (outer lid) असून तो इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर वापरता येतो. यात अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. Amazon India, Flipkart आणि इतर ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर उपलब्ध आहे. 1000 ते 1500 रूपयांत हा कुकर मिळेल.

4) बटरफ्लाय ब्लू लाईन स्टेनलेस स्टिल कुकर (Butterfly Blue Line Stainless Steel Pressure Cooker)

स्टेनलेस स्टीलपासून बनलेला असल्याने हा कुकर अधिक टिकाऊ आहे. स्टेनलेस स्टीलचा वापर केल्याने तो स्वच्छ करायला सोपा असतो आणि अन्नासोबत रासायनिक क्रिया करत नाही. हा गॅस आणि इंडक्शनवर वापरता येतो. Flipkart, Amazon India आणि अन्य ऑनलाइन स्टोअर्सवर उपलब्ध आहे. 200 ते 2500 रूपयांत हा कुकर मिळेल.

5) प्रेस्टिलाईन ट्राय प्ले स्टेनलेस स्टिल इनर लिड प्रेशर कुकर (Pristine Tri-Ply Stainless Steel Inner Lid Pressure Cooker)

हा एक प्रीमियम पर्याय आहे. 'Tri-Ply' म्हणजे कुकरच्या तळाला स्टील-एल्युमिनियम-स्टील असे तीन थर असतात, ज्यामुळे उष्णता समान पसरते आणि अन्न जळत नाही. हा कुकर इंडक्शन सुरक्षित असून त्यात मजबूत झाकण आहे. 3000 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला हा कुकर मिळेल.

टॅग्स :खरेदीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स