lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Shopping > नव्या स्टाईलचे देखणे- लखलखते आकाशकंदील,  खिशाला परवडणाऱ्या किमतीत- लावा सगळ्यांपेक्षा वेगळा सुंदर आकाशकंदील

नव्या स्टाईलचे देखणे- लखलखते आकाशकंदील,  खिशाला परवडणाऱ्या किमतीत- लावा सगळ्यांपेक्षा वेगळा सुंदर आकाशकंदील

Aakash Diva Shopping For Diwali: आकाश दिव्यांची खरेदी करायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून घ्या, कमी किंमतीत खूप छान आकाशदिवे मिळू शकतात (Aakash Kandil Shopping at low price)..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2023 01:16 PM2023-11-06T13:16:03+5:302023-11-06T13:16:57+5:30

Aakash Diva Shopping For Diwali: आकाश दिव्यांची खरेदी करायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून घ्या, कमी किंमतीत खूप छान आकाशदिवे मिळू शकतात (Aakash Kandil Shopping at low price)..

Aakash Diva Shopping For Diwali, Aakash Kandil Shopping at low price, Latest trendy Diwali Lanterns | नव्या स्टाईलचे देखणे- लखलखते आकाशकंदील,  खिशाला परवडणाऱ्या किमतीत- लावा सगळ्यांपेक्षा वेगळा सुंदर आकाशकंदील

नव्या स्टाईलचे देखणे- लखलखते आकाशकंदील,  खिशाला परवडणाऱ्या किमतीत- लावा सगळ्यांपेक्षा वेगळा सुंदर आकाशकंदील

Highlightsया वर्षी सध्याच्या ट्रेण्डनुसार आकर्षक आकाशदिव्यांची खरेदी करायची असेल आणि ती ही तुमच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत, तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा

दिपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव... या दिवशी आपण आपल्या घरात पणती, लाईटिंग, आकाश दिवे (Latest trendy Diwali Lanterns) यांच्या माध्यमातून जेवढे जास्तीत जास्त दिवे लावू, तेवढी या सणाची शोभा वाढत जात. कारण शेवटी हा एक दिपोत्सवच असतो. आता दिपोत्सव म्हटलं की लायटिंग आलीच. पण ही लाईटिंगही तेव्हाच उठून दिसते, जेव्हा तिच्या मधोमध आपण एक आकर्षक आकाश दिवा किंवा आकाश कंदिल लावतो (Aakash Diva Shopping For Diwali). आता या वर्षी सध्याच्या ट्रेण्डनुसार आकर्षक आकाशदिव्यांची खरेदी करायची असेल आणि ती ही तुमच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत, तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा (Aakash Kandil Shopping at low price).. 

 

१. हा आकाशदिवा तसं पाहायला गेलं तर अगदी साधा आहे. पण आपण जेव्हा त्यात लाईट सोडतो, तेव्हा तो खूप छान चमकून दिसतो.

दिवाळीत घराची साफसफाई करून आजारी पडाल, ५ गोष्टी लक्षात ठेवा- न थकता करा काम

या आकाश दिव्यावर लाकडी काम केलं असून घर जर थोड्या जुन्या पद्धतीचं असेल तर हा आकाशदिवा शोभून दिसेल. सध्या हा आकाशदिवा ३७० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. याच्यासारखे इतर अनेक प्रकार पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BH54DSR4

 

 

२. या प्रकारच्या आकाशदिव्यांची मागच्या २- ३ वर्षांपासून चांगलीच क्रेझ आहे. यावर्षीही या आकाश दिव्यांची लोकप्रियता कायम आहे.

दिवाळीत फराळावर ताव मारला तरी वजन वाढणार नाही, फक्त ३ टिप्स लक्षात ठेवा- वजन राहील कंट्रोलमध्ये

या आकाश दिव्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुम्ही जेव्हा लाईट सोडता तेव्हा तो वेगवेगळ्या रंगांनी तर चमकून उठतोच, पण जेव्हा त्यात लाईट नसतात, तेव्हाही तो अतिशय सुबक आणि देखणा दिसतो. अगदी लहान आकारापासून ते मोठ्यापर्यंत अनेक प्रकारात तो उपलब्ध आहे. सध्या हा दिवा ३६९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09FGTF68Q

 

 

३. हे आकाशदिवे दिसायला साधे वाटतात, पण जेव्हा तुम्ही त्यात लाईट सोडता तेव्हा ते तुमच्या घराला अतिशय क्लासी लूक देतात.

गंजलेल्या कळकट झालेल्या किचन ट्रॉली ५ मिनिटात होतील चकाचक, बघा १ सोपा उपाय

दिवाळीला तर ते छान दिसतातच पण वाढदिवसाची पार्टी, ख्रिसमस पार्टी यांच्या डेकोरेशनलाही छान दिसतात. या ४ आकाशदिव्यांचा सेट २९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BWMC37GW

 

Web Title: Aakash Diva Shopping For Diwali, Aakash Kandil Shopping at low price, Latest trendy Diwali Lanterns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.