Lokmat Sakhi >Shopping > ऑफिस लूक साठी परफेक्ट ५ लिपस्टिक, दिसाल स्मार्ट आणि प्रोफेशनल, ‘अशी’ निवडा शेड

ऑफिस लूक साठी परफेक्ट ५ लिपस्टिक, दिसाल स्मार्ट आणि प्रोफेशनल, ‘अशी’ निवडा शेड

5 Lipstick perfect for office or professional look : उठावदार आणि स्मार्ट लूक देतील अशा शेड कोणत्या ते समजून घेऊया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2024 05:07 PM2024-01-01T17:07:22+5:302024-01-02T14:14:24+5:30

5 Lipstick perfect for office or professional look : उठावदार आणि स्मार्ट लूक देतील अशा शेड कोणत्या ते समजून घेऊया...

5 Lipstick perfect for office or professional look : 5 Lipstick Shades That Will Perfectly Suit Office Look, Look Smart-Professional... | ऑफिस लूक साठी परफेक्ट ५ लिपस्टिक, दिसाल स्मार्ट आणि प्रोफेशनल, ‘अशी’ निवडा शेड

ऑफिस लूक साठी परफेक्ट ५ लिपस्टिक, दिसाल स्मार्ट आणि प्रोफेशनल, ‘अशी’ निवडा शेड

लिपस्टीक ही महिलांच्या मेकअपमधली अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. इतर काही मेकअप केला किंवा नाही केला तरी घराबाहेर पडताना काजळ आणि लिपस्टीक या किमान गोष्टी प्रत्येक जण लावतेच लावते. लिपस्टीकमुळे चेहरा हायलाईट होण्यास आणि तुम्ही छान उठून दिसण्यास मदत होते. लिपस्टीक लावण्याची, ती कॅरी करण्याचीही एक कला असते. ती तुमच्याकडे असेल तर तुमचा लूक छान उठून येण्यास मदत होते. दिवसाची वेळ, कार्यक्रमाचे स्वरुप, कपडे यांनुसार लिपस्टीकच्या शेडची परफेक्ट निवड करायला हवी. यासाठी मेकअपविषयी किमान ज्ञान असणे गरजेचे असते (5 Lipstick perfect for office or professional look). 

सध्या बाजारात सौंदर्यप्रसाधनांच्या असंख्य कंपन्या असून त्यातील आपल्याला सूट होणारे, परवडणारे असे उत्पादन आपण वापरत असतो. कंपनी किंवा किंमत हा एक मुद्दा असला तरी लिपस्टीकची शेड हा मेकअपमधील एक महत्त्वाचा मुद्दा असतो. ऑफीसला किंवा एखाद्या प्रोफेशनल मिटींगला जाताना आपण सहसा लाल, मरुन, गुलाबी अशा गडद रंगांच्या लिपस्टीक लावत नाही. तर थोड्या न्यूड शेडमध्ये जाणाऱ्या, लाईट आणि नॅचरल लूक देणाऱ्या शेडसची आपण निवड करतो. आता प्रोफेशनली आपल्याला अशा उठावदार आणि स्मार्ट लूक देतील अशा शेड कोणत्या ते समजून घेऊया...

(Image : Google)
(Image : Google)

१. मेबालिन – सेन्सेशनल अल्टीमॅटस लिपस्टीक 

यामध्ये मॅट प्रकारात बऱ्याच शेड असून स्कीन कलरशी मिळती जुळती अशी ही शेड प्रोफेशनल लूकसाठी नक्कीच छान दिसेल. बराच काळ ओठावर टिकेल अशा या लिपस्टीकची किंमत ५५० च्या रेंजमध्ये आहे.

https://bit.ly/3RFSHNL

२. इनसाईट कॉस्मेटीक्स नॉन ट्रान्सफर मॅट लिपस्टीक

स्वस्तात मस्त आणि नॅचरल लूक देणारी ही लिपस्टीक लावल्यावर फारच छान दिसते. अगदी २५५ रुपयांत असल्याने आपण ऑफीस लूकसाठी ही लिपस्टीक नक्कीच खरेदी करु शकतो. ऑफीसला फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर अशा कशावरही ती छान दिसते.

https://bit.ly/48fMizP

३. नायका क्रिमी मॅक लिपस्टीक 

वेक अप मेक अप असे अनोखे नाव असलेली ही शेड प्रोफेशनलीच नाही तर नेहमीच्या वापरासाठीही अतिशय छान पर्याय आहे. नायकाच्या लिपस्टीक लाँग लास्टींग असल्याने आणि ३०० रुपयांत ही ४ ग्रॅम लिपस्टीक येत असल्याने या पर्यायाचा तुम्ही नक्कीच विचार करु शकता. 

https://bit.ly/3H4gySu

४. मेबालिन सेन्सेशनल लिक्विड मॅट लिपस्टीक

(Image : Google)
(Image : Google)

पिंक नसली तरी थोडी पिंककडे झुकणारी आणि अतिशय सोबर दिसेल अशी ही शेड तुमचा स्कीन टोन, कपड्यांचा रंग कोणाताही असला तरी त्यावर खुलून दिसेल. 

https://bit.ly/47rH2s0

५. लॉरीयल पॅरीस सिग्नेचर मॅट लिपस्टीक 

लिक्वि़ड स्वरुपातली अशी ही लिपस्टीक लॉरीयल या नामांकित ब्रँडची असल्याने काहीशी महाग आहे. पण ही शेड अतिशय सुंदर असून तुमचा प्रोफेशनल लूक खुलण्यास याची नक्कीच मदत होईल.

https://bit.ly/3S1OqFS


 

Web Title: 5 Lipstick perfect for office or professional look : 5 Lipstick Shades That Will Perfectly Suit Office Look, Look Smart-Professional...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.