Join us

उन्हाळ्यात कूलर खरेदी करण्यापूर्वी ५ गोष्टी तपासा, नाहीतर महागडं कुलर घेऊन पस्तावाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2024 15:42 IST

Summer Special Shopping For Air Cooler: उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कूलर खरेदी करणार असाल तर खरेदी करण्यापुर्वीच काही गोष्टींची खात्री करून घ्या...जेणेकरून तुमची कूलरची निवड फसणार नाही. (5 important tips for purchasing air cooler)

ठळक मुद्देउन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी कूलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी जरूर तपासून घ्या

उन्हाचा पारा आता सगळीकडेच खूप वाढला आहे. घरात पंखा, कूलर असल्याशिवाय तर बसणं अशक्य झालं आहे. त्यातही पंख्याचं वारं खूप उष्ण येतं. कारण या दिवसांत भिंतीही खूपच तापतात. त्यामुळे उष्ण वारं फेकणारा पंखा नको वाटतो आणि एसीचा खर्च परवडण्यासारखा नसतो. म्हणूनच अनेक जण कूलर घेण्याचा मधला मार्ग निवडतात. तुम्हीही उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी कुलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी जरूर तपासून घ्या (how to choose perfect air cooler for home). त्यामुळे अचूक कूलरची खरेदी करणं सोपं होईल आणि उन्हाळा सुसह्य होईल. (5 important tips for purchasing air cooler)

 

कूलरची खरेदी करताना ५ गोष्टी तपासून घ्या

१. बाजारात खूप वेगवेगळ्या आकाराचे कूलर आहेत. आता त्यापैकी तुमच्या खोलीसाठी योग्य ठरणारा कोणता हे ओळखायचं असेल तर खोलीचा एरिया लक्षात घ्या. त्यानुसार तुम्हाला किती मोठं कूलर घ्यावं लागेल हे दुकानदार सांगू शकेल.

माधुरी दीक्षित केसांना महागडं, ब्रॅण्डेड नाही, तर 'हे' साधं घरगुती तेल लावते, बघा व्हायरल व्हिडिओ

२. डेझर्ट कूलर, रुम एअर कूलर, विंडो एअर कूलर असे कुलरचे प्रकार आहेत. यापैकी आपल्यासाठी कोणतं योग्य आहे हे ठरवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुम्ही ते कूलर ठेवणार कुठे, तुमच्याकडे किती जागा आहे या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

 

३. जागा भरपूर मोठी असेल आणि तुमच्याकडे पाण्याची अडचण नसेल तर तुम्ही डेझर्ट कूलर घेऊ शकता. पण डेझर्ट कूलरची स्वच्छता नियमितपणे करावी लागते. अन्यथा त्याच्यातल्या पाण्यात किडे, अळ्या होऊ शकतात. 

उन्हामुळे गळून गेल्यासारखं होतं? दही घातलेले ६ पदार्थ अधूनमधून खा, उष्णतेचा त्रास होणार नाही

४. कमीतकमी मेंटेनन्स आणि कमीतकमी पाणी लागणारे बरेच कूलर सध्या बाजारात पाहायला मिळतात. त्यापैकी एखादं घेणं बेस्ट आहे. 

भर उन्हाळ्यातही फुलांनी भरगच्च बहरून जातील रोपं, करून बघा 'या' जादुई पाण्याची कमाल

५. डेझर्ट कुलर किंवा विंडो कूलर  न घेता रुम एअर कूलर  घेणार असाल तर ते शक्यतो वजनाला हलकं असावं. कारण कुलर बऱ्याचदा खोलीच्या एका भागातून दुसऱ्या भागात हलवलं जातं. त्यामुळे हलवायला सोपं असणारं कुलर घ्या. 

 

टॅग्स :खरेदीसमर स्पेशल शॉपिंगसुंदर गृहनियोजनहोम अप्लायंस