काळ बदलला, माणसं बदलली त्यासोबत समस्यांचे स्वरुपही बदलत गेले. 'बदल चांगला असतो आणि तो सातत्याने व्हायला हवा' असे म्हटले जाते. मात्र प्रत्येक मान्यतेला अपवाद असतात तसाच या मान्यतेला असलेला अपवाद म्हणजे बदलेले नव्या पिढ्यांचे वागणे. (Young people's new sex culture, experiments with unsafe sex, are destroying young lives)जुनी पिढी आणि नवी पिढी वर्षानुवर्षे वैचारिक मतभेद मांडत आलेले आहेत आणि ते सहाजिकच आहे. मात्र सध्या चित्र काही भलतंच दिसतं. उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिल्यावर तुम्हालाही अनेक गोष्टी जाणवतील ज्या कोणत्याही व्यक्तीसाठी घातक आहेत. अनेक पैलू आहेत त्यापैकी सगळ्यात भयानक पैलू म्हणजे बदललेले 'Sex culture'. तरुण पिढीला अगदी सामान्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी ऐकून पालकांचे तर डोळेच फिरतील.
लैंगिकसंबंधाचे बदलते स्वरुप शारीरिक आरोग्यासाठी चांगले नाही आणि मानसिक आरोग्यासाठी तर नाहीच. अगदी १६ वर्षाच्या मुलीही डिप्रेशनच्या गोष्टी करतात. घरात पैशाची कमतरता नाही, आई-वडील जे हवे ते आणून देतात, सगळे मानासारखे होते तरी कसले डिप्रेशन येते? असा प्रश्न जुन्या पिढीला नक्कीच पडत असेल. त्याचे एक कारण म्हणजे सध्याचे सेक्स कल्चर. अगदी शाळेतल्या मुलांनाही वयाआधी पंख फुटतात. इंटरनेटवर सारे उपलब्ध आहे. त्यामुळे सोशल मीडिया, पॉर्नोग्राफी या गोष्टी या मुलांना आरामात पाहता येतात. बौद्धिक ज्ञान वाढण्याआधीच शारीरिक गरजा निर्माण होतात आणि त्या भागवण्याचे मार्ग ही तरुण मुलं विचित्र शोधतात. पालकांशी संवाद साधण्याच विचारही मुलं करत नाहीत.
आजकाल, ओपन रिलेशनशिप, कॅज्यूअल्स, वन नाईट स्टॅण्ड एवढेच नाही तर नको ते प्रयोग करुन पाहणेही अगदी सामान्य झाले आहे. मेंदू काम करायचा बंद होईपर्यंत व्यसने करुन नंतर नावही माहिती नसलेल्या माणसासोबत लैंगिक संबंध ठेवण्यात काहीच वावगं वाटत नाही. एकाच वेळी अनेक आता अगदी सामान्य गोष्ट आहे. त्यामुळेच आजकाल AIDS, STI,HPV, HIV सारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. अगदी १५ - १६ वर्षाच्या मुलीही सेक्स पिल्स, नो प्रेगनंसी पिल्स घेतात त्यामुळे पाळी सुरु होण्याचा वयातच पाळीवर त्याचा भयंकर परिणाम होतो.
या सगळ्या प्रकरणातून हळूहळू डिप्रेशन वाढते. मानसिक आरोग्य खराब होते. एन्झायटीचा त्रास होतो, नैराश्य वाढते. आयुष्यातून आनंद निघून जातो. आयुष्य संपवण्याचे विचार येतात. व्यक्तींचे भास होतात. आभ्यास तर बाजूलाच राहतो. त्याच रसच उरत नाही. हळूहळू सेक्स , रोमान्समधूनही मन उडते मात्र तोपर्यंत शरीराची फार वाट लागलेली असते. पालकांनी आपल्या पाल्यांना या साऱ्या चक्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या विचारधारणेत जवळपास अर्ध्याहून जास्त पिढी अडकली आहे. त्यामुळे मुलांना महागडे फोन गिफ्ट करण्याआधी जरा विचार करा. सगळे हट्ट पुरवण्याआधी बदलत्या पिढीबद्दल जाणून घ्या. एकंदरीत पाश्चात्य संस्कृतीतून आलेले हे सेक्स कल्चर समाजाला आतून ढोबळ करत आहे.