Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Relationship > एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या तरुण-तरुणींचा छळ, ‘गॅसलायटिंग’ने जगणं असह्य-पण तोंडाला कुलूप

एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या तरुण-तरुणींचा छळ, ‘गॅसलायटिंग’ने जगणं असह्य-पण तोंडाला कुलूप

What Is Gaslighting : हल्ली नात्यांचे वेगवेगळे ट्रेंड बघायला मिळतात. त्यातीलच एका ट्रेंडची सध्या चर्चा आहे. हा ट्रेंड म्हणजे 'गॅसलायटिंग'. बरीच तरूण मंडळी अलिकडे या ट्रेंडने त्रासात आहे.य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:34 IST2026-04-09T15:18:01+5:302026-04-09T15:34:31+5:30

What Is Gaslighting : हल्ली नात्यांचे वेगवेगळे ट्रेंड बघायला मिळतात. त्यातीलच एका ट्रेंडची सध्या चर्चा आहे. हा ट्रेंड म्हणजे 'गॅसलायटिंग'. बरीच तरूण मंडळी अलिकडे या ट्रेंडने त्रासात आहे.य

Young people are falling prey to 'gaslighting' in the name of love, don't turn a blind eye to these things about your partner | एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या तरुण-तरुणींचा छळ, ‘गॅसलायटिंग’ने जगणं असह्य-पण तोंडाला कुलूप

एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या तरुण-तरुणींचा छळ, ‘गॅसलायटिंग’ने जगणं असह्य-पण तोंडाला कुलूप

What Is Gaslighting : हल्ली ना नात्यांची परिभाषाच बदलली आहे. आपण नात्यांमध्ये इतके गुरफटलेलो असतो की, त्यांना त्यातून बाहेर पडण्याची इच्छा असूनही बाहेर पडू शकत नाहीत. नातं टॉक्सिक झालेलं असतं. पण प्रेमाखातर सगळं सहन केलंजातं. आपण स्वत:लाच दोष देऊ लागतो. जेवढ्या जास्त गोष्टी आपण सहन करत असतो, तेवढ्या जास्त त्या बिघडतात. हल्ली नात्यांचे वेगवेगळे ट्रेंड बघायला मिळतात. त्यातीलच एका ट्रेंडची सध्या चर्चा आहे. हा ट्रेंड म्हणजे 'गॅसलायटिंग'. बरीच तरूण मंडळी अलिकडे या ट्रेंडने त्रासात आहे.

बरेचजण आजकाल 'गॅसलायटिंग'चे शिकार होत आहेत. पण त्यांना हे माहितीच नसतं. त्यांच्यासोबत जे घडतंय ते का घडतंय तेही कळायला मार्ग नसतो. ते प्रेमाच्या नावाखाली अडकून पडलेले असतात. आता गॅसलायटिंगबाबत सांगायचं तर ही एक सायकॉलॉजिकल मॅनिपुलेशनची पद्धत आहे. ज्यामुळे पार्टनर वैतागतो आणि नात्यातून बाहेर पडतो किंवा पडते. याची लक्षणं काय असतात हे आपण बघणार आहोत. 

ओव्हररिअॅक्ट

पार्टनर जर छोट्या छोट्या अनावश्यक गोष्टींवर विनाकारण जास्त व्यक्त होत असेल, ओव्हररिअॅक्ट करत असेल आणि चुकीच्या गोष्टी बोलत असेल तर आपल्यासोबत 'गॅसलायटिंग' होत असल्याचं समजा. यामुळे आपल्या मनावर मोठा आघात होऊ शकतो.

चुकीचं ठरवणं

जर आपला/आपली पार्टनर आपल्याला सगळ्यांसमोर चुकीचं ठरवत असेल तर आपण गॅसलायटिंगचे शिकार होत आहात. आपण बघतो की, काही लोक पूर्णपणे आपल्या पार्टनरवर अवलंबून असतात. ज्याचा फायदा घेतला जातो.

संशय घेणे

जर आपण नात्यात झोकून देऊनही पार्टनर सतत आपल्याला संशय करत असेल किंवा बऱ्याच गोष्टी विसरत असेल तर समजून घ्या की, आपल्यासोबत 'गॅसलायटिंग' होत आहे. वेळीच हे नातं विसरून पुढे जाण्याचा विचार केला पाहिजे.

बरोबर असूनही माफी

जर आपलं बरोबर असेल आणि तरी सुद्धा आपला/आपली पार्टनर माफी मागण्यास सांगत असेल तर यावर आपण योग्य तो विचार करायला हवा. 

दुर्लक्ष करणे

जर आपला/आपली पार्टनर आपल्याकडे दु्र्लक्ष करत असेल, आपल्या बोलण्याला गंभीरतेने घेत असेल तर समजा आपल्यासोबत गॅसलायटिंग होत आहे. आपल्याला कधीही दगा मिळू शकतो.

Web Title : प्यार के नाम पर युवा हो रहे 'गैसलाइटिंग' का शिकार, इन बातों पर न करें अनदेखा

Web Summary : आजकल युवा रिश्तों में 'गैसलाइटिंग' का शिकार हो रहे हैं। इसमें पार्टनर अनावश्यक प्रतिक्रिया देते हैं, गलत ठहराते हैं, संदेह करते हैं, माफी मांगने पर मजबूर करते हैं या अनदेखा करते हैं। ये संकेत रिश्ते में खतरे की घंटी हैं।

Web Title : Gaslighting: Young People Fall Prey in Relationships; Ignore These Signs!

Web Summary : Gaslighting is a psychological manipulation tactic damaging relationships. Partners may overreact, wrongly accuse, or show distrust. Being forced to apologize when right or being ignored are also signs. Recognize these red flags and reconsider the relationship.