What Is Rebound Marriage : आपल्या आजूबाजूला अशी बरीच लोकं असतात जी कधीतरी सिरीअस रिलेशनशिपमध्ये होती. पण काहीना काही कारणांनी त्यांचं ब्रेकअप झालं असेल आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांनी दुसऱ्या कुणाशी तरी संसार थाटला असेल. तर यालाचा म्हणतात रिबाउंड मॅरेज (Rebound Marriage). म्हणजे एखादी व्यक्ती त्यांचं सिरीअस रिलेशनशिप तुटल्यानंतर स्वत:ला मानसिकरित्या सावरायला वेळ न देता दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करतात.
सामान्यपणे बरेच लोक असं करतात. यामागे भावनात्मक कारणं असतात. असं केल्याने सुरूवातीला आपल्याला भलेही त्रास कमी होत असेल, पण पुढे जाऊन याचे काही गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
का करतात रिबाउंड मॅरेज?
रिबाउंड मॅरेजच्या मागे अनेकदा एकप्रकारची भावनात्मक प्रतिक्रिया असते. ज्यात व्यक्ती एकटेपणा, त्रास, फेटाळलं जाण्याची भीती किंवा आधीच्या नात्याच्या आठवणीतून वाचण्यासाठी लगेच एखाद्या नव्या नात्यात उडी घेते.
सायकॉलॉजिकल कारण
सायकॉलॉजिकल दृष्टीने रिबाउंड मॅरेज अनेकदा भावनात्मक कमजोरी किंवा निर्भरतेतून घडतात. तुटलेल्या नात्यानंतर व्यक्तीला एकटं, अपूर्ण आणि रिकामं वाटतं. नवीन जोडीदार काही काळासाठी त्याचा एकटेपणा दूर करण्याचं काम करतो. या स्थितीत अनेकदा लोक आकर्षण किंवा आधाराच्या भावनेला प्रेम समजतात. कारण निर्णय हा भावनात्मक घालमेलीमध्ये घेतला जातो. त्यामुळे अशा लग्नात बऱ्याच गोष्टींची कमतरता राहून जाते.
काय आव्हानं असू शकतात?
अशा जास्तीत जास्त लग्नांमध्ये स्थिरतेची कमतरता जाणवते. आधीच्या नात्यातील भावना, विश्वासाची कमतरता, तुलना किंवा जास्त अपेक्षा यामुळे नव्या नात्यात मिठाचा खडा पडू शकतो. अनेकदा तर सामाजिक दबाव, वाढतं वय किंवा दिखावा देखील अशा नात्यात अडकण्यास भाग पाडतो.
सकारात्मक बाजूही आहे
हे गरजेचं नाही की, रिबाउंड मॅरेज फेल होईल किंवा हे नातं टिकणार नाही. अनेक केसेसमध्ये हे नातं नवीन आणि प्रगल्भ सुरूवातीचा आधारही बनू शकतं. जर व्यक्ती आधीच्या अनुभवातून शिकत असेल, नव्या नात्याला इमानदारीने वेळ देत असेल आणि प्रयत्न करत असेल तर हे नातं चांगलं डेव्हलप होऊ शकतं.
म्हणजेच काय तर रिबाउंड मॅरेज हे यावर टिकतं की, व्यक्ती आपल्या भूतकाळातून किती आणि काय शिकला. आणि आता ती आपलं नवं नातं किती विश्नासाने सांभाळत आहे. लग्नाआधी स्वत:ला भावनात्मक रूपाने ठीक करणं, स्वत:ला स्वीकारणं, जबाबदाऱ्या पार पाडणं आणि नव्या जोडीदाराला क्वालिटी टाइम देणं हे सुखी संसाराचं गुपित आहे.
