Lokmat Sakhi >Relationship > एक खोटा आरोप आणि पुरुषांच्या आयुष्याला सुुरुंग! वैवाहिक नात्यातला ‘छळ’ म्हणजे नेमकं काय?

एक खोटा आरोप आणि पुरुषांच्या आयुष्याला सुुरुंग! वैवाहिक नात्यातला ‘छळ’ म्हणजे नेमकं काय?

What is 'harassment' in a marital relationship? : छळ सहन करणं चूकच, मात्र छळ केला जातो म्हणत चुकीचे आरोप करणंही चूकच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2025 17:24 IST2025-01-10T17:19:19+5:302025-01-10T17:24:01+5:30

What is 'harassment' in a marital relationship? : छळ सहन करणं चूकच, मात्र छळ केला जातो म्हणत चुकीचे आरोप करणंही चूकच.

What is 'harassment' in a marital relationship? | एक खोटा आरोप आणि पुरुषांच्या आयुष्याला सुुरुंग! वैवाहिक नात्यातला ‘छळ’ म्हणजे नेमकं काय?

एक खोटा आरोप आणि पुरुषांच्या आयुष्याला सुुरुंग! वैवाहिक नात्यातला ‘छळ’ म्हणजे नेमकं काय?

केवळ भारतातच नाही, तर जगभरात महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण खूप जास्त आहे.(What  is 'harassment' in a marital relationship?) प्रगत समाज वगैरे सगळं बरोबर आहे. पण महिलांना आजही अनेक कसोट्यांमधून जावे लागते.(What  is 'harassment' in a marital relationship?) एक शब्द पिडितांकडून सातत्याने वापरला जातो तो म्हणजे छळ. माझा छळ होतो. हे वाक्य आपण किरकोळ भांडणातही वापरतो. पण जेव्हा न्यायालयासमोर हा शब्द येतो, तेव्हा त्याचा अर्थ बदलतो. महिलेचा छळ झाल्याच्या तक्रारी जेव्हा कोर्टापर्यंत जातात, तेव्हा महिलांचीदेखील चौकशी होते याचे कारण काय? मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्व न्यायाधीश राहिलेल्या मृदुला भाटकर यांनी अनेक महिलांना छळ शब्दाचा अर्थ माहिती नाही. (What  is 'harassment' in a marital relationship?)असे म्हणत काही महिला खोट्या खटल्यात पुरूषांना अडकवतात .असे सांगितले.

छळाचे मानसिक छळ, शारीरिक असे प्रकार असतात. शारीरिक छळ तर उघड-उघड दिसून येतो. पडताळून पाहता येतो. पण मानसिक छळाबद्दलच्या तक्रारींचा व्यवस्थित विचार करावा लागतो. कारण या तक्रारी खोट्यासुद्धा असतात. असा खुलासा न्यायाधीशांनी केला.आपल्याला हवं त्यापलीकडे समोरचा वागला म्हणजे छळ नाही. अर्ध्याहून जास्त कायदे महिलांच्या बाजूने झुकलेले आहेत. पण  याचा गैरफायदा घेणार्‍या महिला देखील आहेत. काही महिला पैशांसाठी कायद्यांचा जाणून-बुजून गैरफायदा घेतात मात्र छळाची व्याख्या माहिती नसलेल्या महिलाही आहेत. 

नक्की काय आहे मानसिक छळ? तुमच्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट घडली म्हणजे तुमचा छळ झाला, असे नसते. लहान-सहान वादांना किंवा भांडणांना छळाचे रूप देणे म्हणजे अतिश्योक्ति आहे. महिलांनी अन्याया विरुद्ध आवाज उचललाच पाहिजे. छळ सहन न करता ठाम राहिले पाहिजे. पण आधी छळ झाला आहे का मतभेद आहेत हे पडताळा. एक खोटा खटला आणि त्या पुरूषाचे आयुष्य संपून जाते.अगदी बलात्काराच्या सुद्धा खोट्या तक्रारी केल्या जातात. अनेक पुरूष चूक नसताना फळे भोगतात. आपल्या भल्यासाठी मिळालेल्या या सोयींचा, आपल्या पारड्यात झुकलेल्या कायद्यांचा असा गैरफायदा करणे हा गुन्हाच. 

Web Title: What is 'harassment' in a marital relationship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.