Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टी घेऊन घरी बसलेला जोडीदार ढाराढूर झोप काढतो, बोलत असताना पेंगतो? अभ्यासाचा दावा, दुरावा नाही हे तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:34 IST

Unknown Fact : अनेकदा असं होतं की, पार्टनरजवळ बसल्याने डोळ्यांमध्ये झोप येते आणि मनात विचार येतो की, कंटाळा तर आला नाहीये ना...पण मुळात सत्य वेगळं असतं.

Unknown Fact : जर तुम्हाला तुमचा पार्टनर जवळ असताना  पुन्हा पुन्हा झोप किंवा सुस्ती येत असेल तर याला नात्याचा कंटाळा किंवा दुरावा असं माननं योग्य ठरणार नाही. उलट याचा अर्थ असा होतो की, आपल्याला या नात्यात भावनात्मक सुरक्षितता जाणवते. अनेक रिसर्चमधून हे समोर आलंय की, आपली भावनात्मक स्थिती आणि झोपेची क्वालिटी यांच्यात खोलवर संबंध आहे. ज्यांना आपल्या नात्यात विश्वास आणि सुरक्षा जाणवत असेल तर त्यांची झोप चांगल्या क्वालिटीची आणि गाढ असते.

अनेकदा असं होतं की, पार्टनरजवळ बसल्याने डोळ्यांमध्ये झोप येते आणि मनात विचार येतो की, कंटाळा तर आला नाहीये ना...पण मुळात सत्य हे असतं की, आपला पार्टनर एक 'ग्रीन फ्लॅग' असतो, त्यामुळे असा अनुभव पूर्णपणे सामान्य आहे. आपल्या लोकांसोबत सुरक्षित आणि आरामदायक वातावरणात राहिल्याने शरीर आपोआप सैल पडतं. याचं कारण पूर्णपणे वैज्ञानिक आहे. अशा स्थितीत आपले हार्मोन आणि नर्वस सिस्टीम रिलॅक्स मोडमध्ये जाते.

शरीर का होतं रिलॅक्स?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रकाशित रिपोर्टनुसार, ज्या लोकांचं भावनिक नातं घट्ट असतं, सुरक्षित असतं, ते लोक चांगली आणि भरपूर झोप घेतात. सोबतच त्यांचं एकंदर आरोग्यही चांगलं राहतं. खरंतर मनुष्याचं शरीर संभावित धोका टाळण्यासाठी नेहमीच अलर्ट असतं. पण जसे आपण विश्वासू आणि आपल्या हक्काच्या व्यक्तीसोबत असतो, तेव्हा अलर्ट सिस्टीम शांत होते. हेच कारण आहे की, भावनात्मक सुरक्षा मिळाल्यावर शरीर स्वत:हून रिलॅक्स होऊ लागतं.

यादरम्यान शरीरात ऑक्सीटोसिन म्हणजेच लव्ह हार्मोनचं प्रमाण वाढू लागतं. याने स्ट्रेस वाढवणारे कार्टिसोल हार्मोन कमी होतात आणि गाढ झोप लागण्यास मदत मिळते. सोबतच याने विश्वास, जवळीकता आणि भावनिक कनेक्शन आणखी मजबूत होतं.

प्रेम आणि सुरक्षेची जाणीव पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला अ‍ॅक्टिव करते, ज्याला ‘रेस्ट अ‍ॅन्ड डायजेस्ट’ मोड म्हटलं जातं. याने हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर संतुलित होतं. तसेच शरीर आरामदायक झोपेसाठी तयार होतं. एकटे असल्यावर डोक्यात वेगवेगळ्या चिंता, विचार सतत सुरू असतात. जसे की, भविष्यात काय होईल, स्वत:ला सिद्ध करण्याचं प्रेशर इत्यादी. पण एक समजदार आणि आधार देणारा पार्टनर या चिंता बऱ्याच कमी करतो.

मन शांत होतं आणि झोप आपोआप लागू लागते. हा आराम देणारा अनुभव नातं किती घट्ट आहे हे तर दर्शवतो, सोबतच आरोग्यावरही सकारात्मक प्रभाव टाकतो. विश्वास आणि मानसिक शांतता हृदय निरोगी ठेवते. तणाव कमी करते, इम्युनिटी वाढवते आणि चिंताही कमी करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Do You Feel Sleepy Near Your Partner? Science Explains

Web Summary : Feeling sleepy near your partner signifies emotional security, not boredom. Research links strong relationships to better sleep. Trust and comfort activate relaxation, releasing 'love hormones,' reducing stress, and fostering deeper connection and well-being. A supportive partner eases anxieties, promoting restful sleep and a healthier heart.
टॅग्स :रिलेशनशिपआरोग्य