Gen Z New Lifestyle : बदलता काळ आणि वेगानं विकसित होणाऱ्या टेक्नॉलॉजीनं आजकालच्या तरूणांची म्हणजे Gen Z ची लाइफस्टाईल (Gen Z Lifestyle) पार बदलली आहे. खासकरून जेन झी (1996 ते 2010 काळात जन्माला आलेले) यांची तुलना जर जेन-एक्ससोबत केली (1965 ते 1980 काळात जन्माला आलेले) तर इतके बदल दिसून येतील की त्यावर विश्वासही बसत नाही.
अमेरिकन इंटरप्रायजेस इन्स्टिट्यूटवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जेन-झी जेन-एक्सच्या तुलनेत बाहेर कमी वेळ घालवतात. सर्व्हेनुसार, जेन झी आठवड्यातून सरासरी केवळ 49 मिनिटं बाहेर राहतात आणि इतर वेळ ते घरात घालवतात. तेच जेन-एक्स रोज जवळपास 65 मिनिटं बाहेर घालवतात.
बाहेर कमी जाण्याची कारणं काय?
या सर्व्हेमध्ये सहभागी 67% जेन-झी नी मान्य केलं की, ते अनेक दिवस घराबाहेर न निघता घरात आराम करू शकतात. पण घराबाहेर न निघण्याचं कारण केवळ टेक्नॉलॉजी नाही तर इतरही काही कारणं आहेत. जसे की, 25% जेन-झी म्हणाले की, ते वातावरण खराब असल्यानं बाहेर पडत नाहीत, 16% जेन-झी कडे वेळ कमी आहे, तर काही टक्के जेन-झी ना एकटं बाहेर जायलं आवडत नाही. त्यांना मित्रांसोबत किंवा जवळच्या व्यक्तीसोबत बाहेर जायला आवडतं.
तसेच वाढलेला स्क्रीन टाइम सुद्धा एक मोठी समस्या आहे. आजची तरूणाई किंवा लहान मुले सुद्धा मोबाइल, लॅपटॉप किंवा ऑनलाइन कंटेंटमध्ये जास्त व्यस्त असतात. त्यामुळे बाहेरील जगापासून त्यांचा संपर्क तुटतो किंवा त्यांना त्यात काही रस नसतो.
सोशल लाइफचा नवा अंदाज
बाहेर न जाताही जेन-झी आपली सोशल लाइफ कमजोर होऊ देत नाहीयेत. ते डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून नात्यांना वेगळ्या पद्धतीनं जगत आहेत. एका डेटिंग अॅपचा रिपोर्ट सांगतो की, भारतात जेन-झी लॉंग डिस्टेन्स रिलेशनशिपला आता अडथळा किंवा अडचण मानत नाहीत. उलट त्यांना त्यात जास्त इंटरेस्ट असतो.
बरेच कपल्स आता व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून वेळ घालवत आहेत. ऑनलाइन सिनेमे बघत आहेत, व्हर्चुअल गेमिंग सेशनमध्ये भाग घेत आहेत. इतकंच नाही तर घरी एकसारखं जेवण ऑर्डर करून ऑनलाइन डेट्सचा अनुभव घेत आहेत.