Join us  

अलर्ट! फेसबुकवर चुकूनही शेअर करू नका या ५ गोष्टी; अन्यथा महागात पडू शकतो फोनचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 1:52 PM

Alert : पण सोशल मीडियावर आपली माहिती शेअर करणं धोकादायक ठरू शकतं. त्यासाठी कोणत्या गोष्टी फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करणं टाळायला हवं हे माहित करून  घ्यायला हवं.

सोशल मीडिया सध्या एखाद्या लाईफलाईनप्रमाणे झालं आहे. ज्यावर तासनतास तुम्ही घालवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट, टेलिग्राम आणि वेगवगेळ्या साईट्सवर लोक आपले अकाऊंट्स क्रिएट करून अनोळखी लोकांशी तासन्तास बोलत बसतात. सोशल मीडियावर आपल्या फिलिंग्स शेअर करणं खूपच सोपं असतं.

पण सोशल मीडियावर आपली माहिती शेअर करणं धोकादायक ठरू शकतं. त्यासाठी कोणत्या गोष्टी फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करणं टाळायला हवं हे माहित करून  घ्यायला हवं. आपली एक सोशल मीडिया पोस्ट आपल्याला मोठ्या धोक्यात आणू शकते. प्रत्येकाला माहित आहे की फेसबुक पोस्ट किती व्हायरल होऊ शकते. यापूर्वीही अनेक पोस्टमुळे विविध प्रकारच्या बनावट बातम्या प्रसारित झाल्याचे दिसून आले आहे. 

१) आपलं लाईव्ह लोकेशन शेअर करू नका

 ही ब्रिटनमधील एक घटना आहे. लाईव्ह लोकेशन शेअर करणं एका जोडप्याला चांगलंच महागात पडलं होतं. फेसबुक पोस्टवर त्यांची लाईव्ह लोकेशन स्टॉकरनं पाहिलं आणि त्यांचा पाठलाग करू लागला. लोकेशन शेअर करणं अनेकांना खूप सामन्य वाटू शकतं.  पण त्यामुळे तुमच्या खासगी आयुष्यात कोणीही डोकाऊ शकतं. म्हणून सोशल मीडियावर लाईव्ह लोकेशन शेअर करणं टाळा.

२) वादग्रस्त  पोस्ट

एका रिपोर्टनुसार २०१९ च्या निवडणूकांच्यावेळी भारतात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली होती. याचं कारण सोशल मीडियावरचे पोस्ट हे होतं.  वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे पोलिस लोकांना त्यांच्या घरातून घेऊन गेले होते. कारण या पोस्टमध्ये राजकीय पक्ष, नेता, संप्रदायाबाबत आक्षेपार्ह  पोस्ट करण्यात आली होती. 

३) आपल्या महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो

काहीजण पासपोर्ट तयार केल्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकतात. तर काहीजण आधारकार्डचा फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात. असं केल्यानं तुमची वैयक्तीक महत्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचते. याचा गैरवापर केला जाऊ शकतो. तुमची ही  चूक मोठ्या गुन्हांचे कारण ठरू शकते. म्हणून आपल्या वैयक्तीत कागदपत्रांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका. 

कोणत्याही धार्मिक, विवादित आणि सांप्रदायिक जागेवरील सेल्फी, ज्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे फोटो शेअर करू नका. 

अश्लिल फोटो,

फेक न्यूज

कोणाच्याही खासगी आयुष्याबाबतचे फोटो

(Image Credit- Live science)

४) आपला फोननंबर शेअर करणं

बरेच लोक ही माहिती सार्वजनिकपणे शेअर करतात, परंतु हे करणे योग्य नाही. असे बरेच लोक आहेत जे आपला फोन नंबर सार्वजनिक करतात आणि स्पॅम ते हॅकिंगला बळी पडतात. स्टॉकर्ससाठी सोशल मीडियावर अशी माहिती मिळवणे म्हणजे सोन्याची खाण मिळण्यासारखे आहे. अशी कोणतीही वैयक्तिक माहिती सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेअर न करण्याचा प्रयत्न करा.

५) बेकायदेशीर गोष्टी

आता तुम्ही असा विचार करत असाल की यात काय बेकायदेशीर आहे. गाडीमध्ये पार्टी करताना फेसबुकवर सेल्फी पोस्ट करणे देखील बेकायदेशीर आहे. अशा बर्‍याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांकडे आपण दुर्लक्ष करतो, परंतु त्या प्रत्यक्षात बेकायदेशीर आहेत आणि आपल्याला अडचणीत आणू शकतात. उदाहरणार्थ, आपण विचार न करता लहान मुलाचा रडण्याचा व्हिडिओ शेअर केल्यास, हे घरगुती हिंसाचाराचे एक प्रकरण बनू शकते.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलरिलेशनशिपफेसबुक