Join us  

Sexual health Tips : सकाळी की रात्री? सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 7:01 PM

Sexual health Tips : बहुतांश लोक कामावरून थकून घरी येतात त्यानंतर रात्री शरीरसंबंध ठेवतात. खरं पाहता त्यावेळी शरीराला विश्रांतीची गरज असते.

ठळक मुद्देअमुक एका वाराला  संबंध ठेवायलाच हवेत असं ठरवलं असेल तर त्यावेळी घरात एखादी अडचड असेल, मूडच नसेल तर आनंद  घेता येऊ शकत नाही.  याऊलट अनेक लोकांची तक्रार असते की, शारीरिक दोष नसूनही अनेकदा तीन- चार महिने संबंध ठेवले जात नाहीत. कारण कामाच्या वेळा, मुलांच्या झोपण्याच्या वेळा या सगळ्यात वेळ मिळत नाही.

जर तुम्हाला असं वाटत असेल की पार्टनरला सेक्स लाईफमध्ये फारसा इंन्टरेस्ट राहिलेला नाही किंवा सेक्स लाईफ दिवसेंदिवस जास्तच बोअर होत चालली आहे. तर यामागे काही खास कारणं असू शकतात. तुम्हाला कल्पना नसेल पण तुम्ही ज्यावेळी शरीरसंबंध ठेवता त्या वेळेचा तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होत असतो. सुखी आणि आनंदी लैगिंग जीवनासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. याबात सेक्सोलॉजिस्ट अर्थात लैंगिक विकार तज्ज्ञ डॉक्टर राजन भोसले यांनी लोकमतशी बोलताना अधिक माहिती दिली आहे.  

शरीरसंबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती?

डॉ. भोसले सांगतात, ''ज्यावेळी दोघंही रिलॅक्स असतील, शरीरसंबंधांचा मूड असेल किंवा दोघांनाही एकमेंकाबद्दल आकर्षण वाटत असेल तर अशावेळी कपल्समध्ये वेळेचं बंधन आडवं येत नाही. त्यांना जेव्हा सोयीस्कर वाटेल तेव्हा ते शरीरसंबंध ठेवू शकतात. रात्री किंवा सकाळच्यावेळेतच शरीर संबंध ठेवायला हवेत असं काहीही नाही. ज्यावेळी दोघांमध्येही भावना जागृत झालेल्या असतील ती योग्य वेळ ठरू शकते.  म्हणूनच संभोग असा शब्द वापरला जातो. सम आणि भोग म्हणजेच यात दोघांनाही सम प्रमाणात आनंद मिळतो.''

वैद्यकीयदृष्ट्या पहाटेची वेळ प्रभावी ठरते

पुढे त्यांनी सांगितले की, ''पहाटेची वेळ शरीर संबंध ठेवण्यासाठी सगळ्यात उत्तम ठरते. कारण लैगिंक उत्तेजना देणारा टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन पहाटेच्यावेळी स्त्रीयांमध्येही आणि पुरूषांमध्येही चांगला प्रतिसाद देतो. याशिवाय रात्री भरपूर विश्रांती घेतल्यानं पहाटेच्यावेळी फ्रेश वाटतं. पहाटेच्यावेळी मिळणारी उत्तेजनाही वेगळीच असते. त्यामुळे दोघांमध्ये अंडरस्टॅडिंग असेल तर ठरवून पहाटेच्यावेळी शरीरसंबंध ठेवले तर जास्त सुख लाभू शकतं.''

''बहुतांश लोक कामावरून थकून घरी येतात त्यानंतर रात्री शरीरसंबंध ठेवतात. खरं पाहता त्यावेळी शरीराला विश्रांतीची गरज असते. कारण दिवसभर काम केल्यानं शरीरात जराही त्राण नसतो, अशावेळी संबंधांपेक्षा झोपणं जास्त गरजेचं असतं.  लैगिंक संबंधाचा विचार केला तर त्यातही पहाटेची वेळ उत्तम असल्याचं म्हटलं आहे.'' असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

वास्तविक पाहता अनेक जोडप्यांची  दिनचर्या आणि कौटुंबिक वातावरणामुळे त्यांना सकाळी शरीरसंबंध ठेवणं शक्य होत नाही.  उदा. ऑफिसला किंवा जीमला जाण्यासाठी लवकर उठावं लागतं, मुलांच्या शाळेची तयारी, स्वयंपाक करण्यासाठीच लवकर उठावं लागतं. म्हणून सकाळी संबंध ठेवणं शक्य होत नाही. अशा स्थितीत जोडप्यांनी हा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार परस्पर सहमतीने करायला हवा.

रूटिन ठरवून संबंध ठेवणारे लोक लैगिंक आयुष्यात समाधानी नसतात?

मोठ्या संख्येनं  जोडपी शरीरसंबंधाची एक वेळ किंवा दिवस ठरवून घेतात. ठरवलेल्या वेळेशिवाय इतर दिवशी, इतर वेळी  संबंध ठेवत नाहीत.  यावर भोसले सांगतात की, ''ज्यावेळी लोक ठरवून संबंध ठेवतात त्यावेळी एखाद्या रुटीनचा गुलाम असल्याप्रमाणे व्यक्ती वागू लागतो. उदा. शनिवारी किंवा अमुक एका वाराला  संबंध ठेवायलाच हवेत असं ठरवलं असेल तर त्यावेळी घरात एखादी अडचण असेल, मूडच नसेल तर आनंद  घेता येऊ शकत नाही.  

याऊलट अनेक लोकांची तक्रार असते की, शारीरिक दोष नसूनही अनेकदा तीन- चार महिने संबंध ठेवले जात नाहीत. कारण कामाच्या वेळा, मुलांच्या झोपण्याच्या वेळा या सगळ्यात वेळ मिळत नाही. त्यातून दोघांमध्ये ताण वाढतो. अशावेळी मात्र जोडप्यांनी लैंगिक जीवनात आनंद, समाधान मिळवण्यासाठी एखादी वेळ ठरवून, आपल्यातला रोमान्स, नात्यातली ओढ कायम राखली पाहिजे. सुखी लैंगिक जीवनासाठी ते आवश्यक आहे.''

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यलैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप