Join us

Sania Shoaib Marriage : 'ते क्षण मला कठीण दिवसात..' सानिया-शोएब होणार वेगळे? त्या सोशल मीडिया पोस्टनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 17:33 IST

Sania Shoaib Marriage : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, 'मला सर्वात कठीण दिवसांतून घेऊन जाणारे क्षण.'

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. जेव्हा-जेव्हा दोन देशांत क्रिकेटचा सामना होतो. प्रेक्षक खूप उत्साहानं क्रिकेटचा आनंद घेतात. अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी लग्न केले आहे. त्यात पाकिस्तानचा स्टार खेळाडू शोएब मलिक (Shoaib malik) याचे नाव प्रमुख आहे. त्याने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी (Sania Mirza) लग्न केलं. पण आता त्यांच्या वेगळं होण्याच्या चर्चांना सोशल मीडियावर  उधाण आलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. (Shoaib malik sania mirza marriage in speculation of marriage rumours social media)

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, 'मला सर्वात कठीण दिवसांतून घेऊन जाणारे क्षण.' फोटोमध्ये सानिया मिर्झा आणि तिचा मुलगा इझान दिसत आहेत. इझान तिच्या नाकावर चुंबन घेत आहे. सानियाने यापूर्वी एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले होते. तुटलेली मनं कुठे जातात? यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी नुकताच त्यांचा मुलगा इझानचा वाढदिवस साजरा केला होता, याचे अनेक फोटो शोएबने सोशल मीडियावर पोस्ट केले होते, पण सानियाने तसे केले नाही, यावरून दोघांमधल्या वादांबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पाकिस्तानी क्रिकेट शो 'आस्क द पॅव्हेलियन' मध्ये शोएब मलिकला सानिया मिर्झाच्या टेनिस अकॅडमीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने सांगितले की, मला याची माहिती नाही, ज्यावर सर्वजण आश्चर्यचकित झाले.

सानिया मिर्झाने 2010 मध्ये हैदराबादमध्ये शोएब मलिकशी लग्न केले. यावरून दोन्ही देशांमध्ये जोरदार खळबळ उडाली होती. शोएब मलिकची गणना पाकिस्तानच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने पाकिस्तानसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याचबरोबर सानिया मिर्झाने टेनिस विश्वात भारताचे नाव उंचावले आहे. आता त्यांच्या नात्याचं पुढे काय होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकसोशल मीडियासोशल व्हायरलरिलेशनशिप