What Is Gaslighting : रिलेशनशिपचे वेगवेगळे ट्रेंड अलिकडे बरेच बघायला मिळतात. गेल्या काही दिवसात मायक्रो चीटिंग, डेल्यूलू, श्रेकिंग असे ट्रेंड सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. आता सध्या सोशल मीडियावर रिलेशनशिपसंबंधी 'गॅसलायटिंग' (Gaslighting) हा शब्द खूप ऐकायला व वाचायला मिळतोय. तसा हा शब्द फार काही अनोळखी नाही. अनेकांचा याचा अंदाज आला असेलच, हा मानसिक शोषणाचा एक प्रकार असून यात पीडित व्यक्तीला स्वतःच्या विचारांवर, आठवणींवर शंका घ्यायला भाग पाडले जाते.
महत्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे असं करणारे करणारे बहुतेकदा आपलेच जवळचे लोक असतात, ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. तुमच्यासोबतही असे काही घडत असेल तर ते कसं ओळखावं आणि अशा लोकांपासून स्वतःला कसे वाचवावे, हेच आज आपण पाहणार आहोत.
गॅसलायटिंगची लक्षणं
स्वतःच्या विचारांवर संशय येऊ लागतो
वारंवार आपल्या स्मरणशक्तीवर शंका येते
आपण वेडे, चुकीचे किंवा निकृष्ट आहोत असे वाटू लागते
सतत स्वतःला नालायक समजणे
Gaslight करणाऱ्या व्यक्तीकडून पुन्हा पुन्हा माफी मागणे
इतरांनाही त्या व्यक्तीच्या चुकीच्या विचारांवर प्रश्न विचारण्यापासून थांबवणे
लोकांमध्ये मिक्स न होता एकटे राहणे
कोणत्या नात्यांमध्ये जास्त आढळते?
जवळच्या नात्यांमध्ये
पार्टनरवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याचा आत्मविश्वास तोडण्यासाठी.
मुलं आणि पालकांमध्ये
मुलांना गिल्ट फिल करवणे, रडल्यावरही दोष देणे. म्हणजे त्यांना समजून घेण्याऐवजी दोष देत राहणे.
ऑफिसमध्ये
वरच्या पदावरील अधिकारी ऑफिसमध्ये आपल्याला असुरक्षिततेचा भार कनिष्ठांवर टाकतात.
कसे ओळखाल तुमच्यासोबत गॅसलायटिंग होत आहे?
तो किंवा ती कधीच स्वतःची चूक मान्य करत नाही
नेहमी म्हणतो किंवा म्हणते की तुम्हाला काहीच लक्षात राहत नाही
तुमच्याच डोक्यावर जबाबदारी ढकलतो किंवा ढकलते
चूक झाल्यावरही कधीच सॉरी म्हणत नाही
तुमच्या भूतकाळाचा किंवा कमकुवत बाजूंचा गैरफायदा घेतो किंवा घेते