lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > '..पण त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही'; धर्मेंद्रशी लग्नास तयार नव्हत्या हेमामालिनी, स्वतः सांगितलं कारण

'..पण त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही'; धर्मेंद्रशी लग्नास तयार नव्हत्या हेमामालिनी, स्वतः सांगितलं कारण

Relationship Tips : हेमा मालिनी यांनाही धर्मेंद्र आवडू लागले होते पण त्यांच्याशी लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. धर्मेंद्रसारख्या एखाद्या व्यक्तीशी लग्न करेन पण धर्मेंद्रशी करणार नाही असं हेमा मालिनी यांनी ठरवलं होतं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 01:22 PM2021-08-20T13:22:30+5:302021-08-20T13:46:56+5:30

Relationship Tips : हेमा मालिनी यांनाही धर्मेंद्र आवडू लागले होते पण त्यांच्याशी लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. धर्मेंद्रसारख्या एखाद्या व्यक्तीशी लग्न करेन पण धर्मेंद्रशी करणार नाही असं हेमा मालिनी यांनी ठरवलं होतं. 

Relationship Tips : Hema malini once reveals she does not want to marry dharmendra says i will marry a man like him but not him | '..पण त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही'; धर्मेंद्रशी लग्नास तयार नव्हत्या हेमामालिनी, स्वतः सांगितलं कारण

'..पण त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही'; धर्मेंद्रशी लग्नास तयार नव्हत्या हेमामालिनी, स्वतः सांगितलं कारण

Highlightsबऱ्याच वेळा मला असे वाटायचे की जर मला लग्न करायचे असेल तर मी त्याच्यासारख्या व्यक्तीशी लग्न करेन, पण मी त्याच्याशी लग्न करणार नाही. हेमामालिनी यांच्यासह अफेअर सुरु झाले तेव्हा धर्मेंद्र आधीच विवाहीत होते. धर्मेंद यांचे फक्त हेमामालिनीच नाही तर इतर अभिनेत्रींसह अफेअरच्या चर्चा रंगायच्या.

बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी लोकांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. धर्मेंद्र  आणि हेमा मालिनी यांनी लव्ह स्टोरीसुद्धा  काहीशी चित्रपटाच्या कथेप्रमाणेच  आहे. हेमा मालिनी यांना पाहताच धर्मेंद्र त्यांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी यांनाही धर्मेंद्र आवडू लागले होते पण त्यांच्याशी लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. धर्मेंद्रसारख्या एखाद्या व्यक्तीशी लग्न करेन पण धर्मेंद्रशी करणार नाही असं हेमा मालिनी यांनी ठरवलं होतं. 

हेमामालिनी यांनी स्वतः सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला. हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की, “कोणीही म्हणू शकतं की तो एक चांगला, गुड-लुकिंग माणूस आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्याच्याशी लग्न करावे लागेल. म्हणून मी त्याच्याबरोबर काम करत राहिले. "

याबद्दल बोलताना हेमा पुढे म्हणाल्या, "पण माझ्या मनात अशी कोणतीही भावना नव्हती की मी त्याच्याशी लग्न करणार आहे. बऱ्याच वेळा मला असे वाटायचे की जर मला लग्न करायचे असेल तर मी त्याच्यासारख्या व्यक्तीशी लग्न करेन, पण मी त्याच्याशी लग्न करणार नाही. पण नंतर आम्ही लग्न केले, त्यामुळे आपण पुढे काय करणार आहोत हे आधी ठरवू शकत नाही. "

या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सांगितले होते की,  ''मी त्यांच्या जवळ होती आणि आम्ही खूप वेळ एकमेकांसोबत होतो. पण या दरम्यान दुसऱ्या कुणाशी लग्न करण्याचा विचार करताना मला ते योग्य वाटला नाही. अशा स्थितीत मी त्याला फोन केला आणि सांगितले की तुला आता माझ्याशी लग्न करावं लागेल. त्यांनीही लगेच होकार दिला आणि म्हणाला, "ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करेन."

हेमामालिनी यांनी स्पॉटबॉय डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ''लग्नानंतर मला आणि धर्मेंद्र यांना एकत्र घालवण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही. पण यानंतरही मी धर्मेंद्र यांच्याबद्दल तक्रार केली नाही. मला वाटत नाही की मला काहीही बदलायचे आहे. लग्न झाल्यापासून मला त्याच्यासोबत घालवण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही. "

हेमामालिनी यांच्यासह अफेअर सुरु झाले तेव्हा धर्मेंद्र आधीच विवाहीत होते. धर्मेंद्र यांचे फक्त हेमामालिनीच नाही तर इतर अभिनेत्रींसह अफेअरच्या चर्चा रंगायच्या. अभिनेत्री अनिता राज यांच्यासह धर्मेंद्र यांचे अफेअर सुरु असल्याचे प्रचंड चर्चा रंगली. अभिनेत्री अनिता राज ८०च्या दशकात खूपच लोकप्रिय होती. सिनेमात एकत्र काम करताना दोघांची जवळीक वाढली होती.  सगळ्यात आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे. धर्मेंद्र आणि अनिता राज दोघांचे प्रेमप्रकरण सुरु झाले.

तेव्हा हेमामालिनीसह त्यांनी दुसरे लग्न केले होते. दुस-यांदा संसार थाटल्यानंतरही धर्मेंद्र तिस-यांदा प्रेमात पडले होते. मात्र या अफेअरची चर्चा हेमामालिनी यांना समजली तेव्हा धर्मेंद्र यांना धमकीच दिल्याचे बोलले जाते. हेमामालिनी यांच्या भीतीमुळेच धर्मेंद्र अनिता राज एकमेकांपासून दुरावल्याचे बोलले जाते. अफेअरच्या चर्चा असल्यामुळे अनिता राज वादातही सापडल्या होत्या. अखेर त्यांनीही निर्माता सुनील हिंगोरानी यांच्याशी लग्न करत संसार थाटला आणि कायमचे धर्मेंद्र यांच्यापासून दूर गेल्या.
 

Web Title: Relationship Tips : Hema malini once reveals she does not want to marry dharmendra says i will marry a man like him but not him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.