lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > रणबीर कपूरने काढला लेकीच्या नावाचा सुंदर टॅटू, बापाचे काळीज..पाहा कसा दिसतो तो स्पेशल टॅटू...

रणबीर कपूरने काढला लेकीच्या नावाचा सुंदर टॅटू, बापाचे काळीज..पाहा कसा दिसतो तो स्पेशल टॅटू...

Ranbir Kapoor Gets Daughter Raha's Name Tattooed On Collarbone : मुलीवर असलेले प्रेम व्यक्त करण्याची रणबीरची अनोखी पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2023 02:56 PM2023-11-26T14:56:24+5:302023-11-26T14:58:54+5:30

Ranbir Kapoor Gets Daughter Raha's Name Tattooed On Collarbone : मुलीवर असलेले प्रेम व्यक्त करण्याची रणबीरची अनोखी पद्धत...

Ranbir Kapoor Gets Daughter Raha's Name Tattooed On Collarbone : Ranbir Kapoor got a beautiful tattoo of daughter's name, father's grief.. see how that special tattoo looks... | रणबीर कपूरने काढला लेकीच्या नावाचा सुंदर टॅटू, बापाचे काळीज..पाहा कसा दिसतो तो स्पेशल टॅटू...

रणबीर कपूरने काढला लेकीच्या नावाचा सुंदर टॅटू, बापाचे काळीज..पाहा कसा दिसतो तो स्पेशल टॅटू...

अंगावर टॅटू काढून घेण्याची फॅशन गेल्या काही वर्षांपासून तरुण वर्गामध्ये चांगलीच इन आहे. कधी एखादे छान सिम्बॉल, कधी आपल्या नावाचा किंवा आपले प्रेम असलेल्या व्यक्तीच्या, आई-वडीलांच्या नावाचा टॅटू हातावर, मानेवर कोरला जातो. अभिनेते आणि अभिनेत्रीही अनेकदा अशाप्रकारचे टॅटू अंगावर कोरताना दिसतात. बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर यानेही असाच एक खास टॅटू नुकताच कोरुन घेतला आहे. आलिया आणि रणबीर यांची जोडी म्हणजे बॉलिवूडमधील हॉट कपल आहे. या दोघांनी २०२२ मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. नुकताच तिचा पहिला वाढदिवस या कपलने साजरा केल्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते. राहा रणबीरसाठी खूप खास असल्याचे आपण विविध पोस्टमधून पाहतो (Ranbir Kapoor Gets Daughter Raha's Name Tattooed On Collarbone).

 वडील झाल्यानंतर रणबीरने मुलीसाठी घेतलेला ब्रेक असो किंवा तो राहाशी खेळतानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुलगी वडीलांसाठी कायमच खास असते हे दाखवून देणारी आणखी एक गोष्ट रणबीरने केली आहे. ती म्हणजे त्याने तिच्या नावाचा टॅटू कोरुन घेतला आहे.हा टॅटू रणबीरने आपल्या खांद्यावर म्हणजेच कॉलर बोनवर कोरला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीरने या टॅटूबद्दल सांगितले. विशेष म्हणजे शर्ट बाजूला करुन त्याने आपला हा टॅटूही सगळ्यांना दाखवला. आपण येत्या काळात टॅटू काढला तर तो मुलीच्या नावाचा असू शकतो असे त्याने याआधी एकदा सांगितले होते, त्याप्रमाणे आता त्याने हा टॅटू काढला आहे. या दोघांनी आपल्या मुलीचा चेहरा जाहिर केला नसून योग्य वेळ आल्यावर आपण तो जगाला दाखवू असे रणबीर आणि आलियाचे म्हणणे आहे. 

आता रणबीर त्याच्या आगामी अॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये रणबीर कपूरसोबतच अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.एनिमल एक जटिल, गोंधळलेल्या पिता-पुत्राच्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करतो. या चित्रपटात रणबीरचे ऑन-स्क्रीन वडील बलबीर यांची भूमिका अनिल कपूर साकारत आहे. रश्मिका मंदान्ना रणबीरच्या पत्नी गीतांजलीची भूमिका साकारत आहे. अॅनिमलमध्ये बॉबी देओल एक निर्दयी प्रतिस्पर्धी शत्रूची भूमिका साकारणार आहे.

Web Title: Ranbir Kapoor Gets Daughter Raha's Name Tattooed On Collarbone : Ranbir Kapoor got a beautiful tattoo of daughter's name, father's grief.. see how that special tattoo looks...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.