lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > कतरिना-विकीच्या  केमिस्ट्रीच हेवा वाटतो? पण नात्यासाठी त्यांनी 'जे' केलं 'ते' आपल्याला जमेल का?

कतरिना-विकीच्या  केमिस्ट्रीच हेवा वाटतो? पण नात्यासाठी त्यांनी 'जे' केलं 'ते' आपल्याला जमेल का?

जे कोणी आता लग्नासाठी उभे राहाणार आहेत त्यांनी कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नातून स्वत:साठी कोणते धडे घेतले याचा विचार करायला हवा. येथे धडा हा लग्नातला बडेजाव किंवा राजेशाही थाटाचा आणि खर्चाचा नाही. धडा आहे या दोघांच्या नात्यातील आव्हानांचा. त्यांनी आपल्या नात्यात स्वीकारलेली आव्हानं बघून आपण काय शिकलो असा विचार करण्याचा आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 07:23 PM2021-12-20T19:23:57+5:302021-12-20T19:55:58+5:30

जे कोणी आता लग्नासाठी उभे राहाणार आहेत त्यांनी कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नातून स्वत:साठी कोणते धडे घेतले याचा विचार करायला हवा. येथे धडा हा लग्नातला बडेजाव किंवा राजेशाही थाटाचा आणि खर्चाचा नाही. धडा आहे या दोघांच्या नात्यातील आव्हानांचा. त्यांनी आपल्या नात्यात स्वीकारलेली आव्हानं बघून आपण काय शिकलो असा विचार करण्याचा आहे.

Katrina and Vicky kaushal set 5 couple goals by wedding each other. | कतरिना-विकीच्या  केमिस्ट्रीच हेवा वाटतो? पण नात्यासाठी त्यांनी 'जे' केलं 'ते' आपल्याला जमेल का?

कतरिना-विकीच्या  केमिस्ट्रीच हेवा वाटतो? पण नात्यासाठी त्यांनी 'जे' केलं 'ते' आपल्याला जमेल का?

Highlightsविकी कौशलनं आपल्यापेक्षा 6-7 वर्ष वयानं मोठ्या कतरिनाशी लग्न करुन प्रेम असेल, एकमेकांबद्दल जिव्हाळा असेल, एकमेकांचे स्वभाव, विचार जुळत असतील तिथे वयाचा मुद्दा येत नाही हे दाखवून दिलं. कतरिना आणि विकी यांनी लग्न करताना एकमेकांकडे असलेल्या बॅंक बॅलन्सची ना चर्चा केली ना कोणी किती चित्रपटात काम केलं आणि आता कोणाकडे किती चित्रपट आहे हे मोजलं.लग्न करताना थोडेसे भेद खपवून घेणं आता होत असलं तरी वेगळे धर्म , संस्कृतीमधला फरक स्वीकारणं आजच्या आधुनिक काळातही अवघड जातं. तिथे कतरिना आणि विकीमधे हा भेद मोठा आहे.

विकॅट म्हणून कतरिना आणि विकीला माध्यमांनी, चाहत्यांनी प्रेमानं नाव दिलं असलं तरी या दोघांमधे आधी नाव घेतलं जातं ते कतरिना आणि विकी कौशलचं . हे असं म्हणून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात इगोचं बीज पेरण्याची आमची इच्छा नसून या लेखाद्वारे कतरिना आणि विकी कौशलने एकमेकांशी लग्न करुन लग्नाळू मुला मुलींसमोर कोणते कपल गोल्स दिले आहेत हे सांगण्याचा मुख्य उद्देश आहे.

Image: Google

कतरिना आणि विकी कौशल यांचं लग्न होवून ते आपआपल्या संसाराला आणि व्यावसायिक कामालादेखील लागले आहेत. पण आपण काय त्यांच्या लग्नाबद्दल अजून चर्चा करत आहोत? तर हे असं नाही. उलट सुरुवातीच्या कौतुकाच्या चर्चा शमल्यानंतरच जरा हा विषय काढला आहे. या दोघांचं लग्न कसं शाही थाटात झालं, किती खर्च आला, दागिने, कपडे, पदार्थ, मेकअप, हनीमून , शिरा अशा सगळ्या विषयांची मस्त चर्चा होवून आता कोणाचं लग्न? अशा चर्चा व्हायला लागल्या आहेत. समजा सेलिब्रेटींचं जाऊ देत पण जे कोणी आता लग्नासाठी उभे राहाणार आहेत त्यांनी कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नातून स्वत:साठी कोणते धडे घेतले याचा विचार करायला हवा. येथे धडा हा बडेजाव किंवा राजेशाही थाटाचा आणि खर्चाचा नाही. धडा आहे या दोघांच्या नात्यातील आव्हानांचा. त्यांनी आपल्या नात्यात स्वीकारलेली आव्हानं बघून आपण काय शिकलो असा विचार करण्याचा.

Image: Google

विकॅटचं लग्न आणि कपल गोल्स

1. वयाचा विचार नको

मैत्री, प्रेमात भलेही वयाचा विचार होत नाही पण लग्न करायचं म्हटलं की आजही शिकलेल्या घरांमधे मुलगा आणि मुलीमधे एक दोन वर्षाचं अंतर हवंच अशा बेतानं स्थळं शोधली जातात. मुलगी मुलापेक्षा जास्त वयाची तर सोडाच पण बरोबरीची देखील चालत नाही अनेकांना. तिथे विकी कौशलनं आपल्यापेक्षा 6-7 वर्ष वयानं मोठ्या कतरिनाशी लग्न करुन प्रेम असेल, एकमेकांबद्दल जिव्हाळा असेल, एकमेकांचे स्वभाव, विचार जुळत असतील तिथे वयाचा मुद्दा येत नाही हे दाखवून दिलं. आपल्यापेक्षा जास्त वयाच्या मुलीशी लग्न केल्याने आता आपल्याला ट्रोल केलं जाईल हा विचारही विकीच्या मनाला शिवला नाही तर आपल्याला प्रियंका आणि निकप्रमाणे वयानं मोठं असल्यानं टीकेला सामोरं जावं लागेल या विचारानं कतरिना लग्नाचा निर्णय घेताना कचरली नाही. दोघांनी नात्यात वयाचा विचार आधीच बाजूला सारला आहे.

Image: Google

2. नवऱ्यापेक्षा बायको कर्तबगार

मुलीला आपला होणारा नवरा हा त्याच्या करिअरमधे जास्त यशस्वी, जास्त पैसे कमावणारा, जरा जास्त नाव असलेला हवा असतो. स्वत: नोकरी करणार्‍या, उत्तम पगार असणार्‍या मुलीच्या देखील अशा इच्छा असतात हे नवलच ना ! तिथे आपल्यापेक्षा जास्त यशस्वी असलेल्या कतरिनाशी विकीनं लग्न केलं. इतकंच नाही तर बाहेर लग्नाच्या खर्चाचा भार कतरिनानच उचलला अशा चर्चा होत असताना देखील उगाच अंहकार न दुखावून घेता विकीनं तर दुर्लक्ष केलंच पण स्वत: कतरिनालाही हा विषय महत्त्वाचा वाटला नाही. विकी आणि कतरिना लग्न करणार असल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिध्द झाल्या त्याचमुळी कतरिना करणार आपल्यापेक्षा वय आणि करिअरमधे ज्युनियर असलेल्या विकीशी लग्न यासारखे तुलना करणारे हेडिंग्ज घेऊन . पण कतरिना आणि विकी यांनी लग्न करताना ना वय पाहिलं, ना एकमेकांकडे असलेल्या बॅंक बॅलन्सची चर्चा केली, कोणी किती चित्रपटात काम केलं आणि आता कोणाकडे किती चित्रपट आहे हे मोजलं. ते मोजलं असतं तर दोघांचं लग्न पारंपरिक चौकटीत तरी अशक्यच होतं.

3. लोकं काय म्हणतील?

कतरिनाचं लग्न विकीशी होण्याआधी तिच्या आणि सलमानसोबतच्या, तिच्या आणि रणबीर कपूर सोबतच्या चर्चा होत्या. या चर्चा यापुढेही सुरु राहाणार हे कतरिनालाही माहीत होतं आणि विकीलाही. पण लोकं काय म्हणतील, त्यांना काय वाटतंय यापेक्षा दोघांनी एकमेकांना काय वाटतं याला महत्त्व दिलं. दोघांनी लोकं काय म्हणताय हे जर माध्यमांमधे वाचलं, पाहिलं असतं, जरा कानोसा घेतला असता तर लग्नाआधीच ब्रेकअपचा विचार केला असता. पण त्यांनी लोकांच्या आणि माध्यमं हायलाइट करत असलेल्या कुजबुजीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. लोकं काय म्हणतील याचा विचार सोडा हा धडा आपल्याला पाठीवर गाढव घेऊन जाणार्‍या माणसाच्या गोष्टीने शिकवलाच होता तो आता ताजा ताजा कतरिना आणि विकीनं पुन्हा शिकवला एवढंच.

Image: Google

4. प्रेम ठीक पण लग्न?

वय आणि करिअरमधे अंतर असलेले अनेकजण पुढे प्रेमाचं रुपांतर लग्नात करण्यास थोडं कचरतात. मुलाकडून आपण यशस्वी असल्यामुळे पुढे बंधनं घातली जातील अशा शंका मुलीला असतात, लोकं काय म्हणतील हा आईवडिलांच्या मनावरचा समाजाचा पगडा मुलीही अनेकदा स्वत:ही वागवतात. त्याला बिचकून आपल्यात प्रेम होतं, आहे, आपण त्याचा आनंद घेतला पण उगाच लग्न करुन नंतरचे संघर्ष नको म्हणून माघार घेतात. अशी माघार घेण्याचे अनेक मुद्दे कतरिना आणि विकीमधे होते पण त्यांनी दोघांमधील नातेसंबंधाला लग्नाचं अंतिम रुप देताना मागेपुढे पाहिलं नाही.

5. संस्कृती भेद नव्हे संस्कृती मीलन

लग्न करताना थोडेसे भेद खपवून घेणं आता होत असलं तरी वेगळे धर्म , संस्कृतीमधला फरक स्वीकारणं आजच्या आधुनिक काळातही अवघड जातं. तिथे कतरिना आणि विकीमधे हा भेद मोठा आहे. विकी कौशल पंजाबी असून तो लहानाचा मोठा मुंबईत झाला. तर कतरिनाचे वडील मुस्लिम आणि आई ख्रिश्चन. कतरिनाचा जन्म ब्रिटनमधे झाला , तिच्यावरचे सर्व संस्कारही तिथलेच. तसं पाहिलं तर दोघं दोन टोकांवर असतांना त्यांनी ही टोकं एकमेकांशी जोडण्याचं आव्हान स्वीकारलं. आपल्यात आता हा भेद आहे पण तो आपण कमी करु, आपल्या नात्यात या दोन संस्कृतींनाही गुंफून टाकू म्हणत दोघांनी लग्न केलं.

कतरिना आणि विकी कौशलनं लग्न केलं. या लग्नातील चमकधमक थोडी बाजूला सारली तर या दोघांच्या नात्यातील त्यांनी पेललेली आणि यापुढेही पेलावी लागणारी ही आव्हानं नक्की दिसतील. ही आव्हानं त्यांनी स्वीकारली पण आपल्यासमोर अशी आव्हानं उभी राहिली तर, आपण त्यामुळे मागे हटणार की कतरिना विकीच्या लग्नातून मिळालेला धडा गिरवणार?

Web Title: Katrina and Vicky kaushal set 5 couple goals by wedding each other.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.