lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > नवऱ्याचे कौतुक करण्याचा आणि त्याला धन्यवाद म्हणण्याचा खास दिवस, जगभर साजरा झाला कारण...

नवऱ्याचे कौतुक करण्याचा आणि त्याला धन्यवाद म्हणण्याचा खास दिवस, जगभर साजरा झाला कारण...

Husband Appreciation Day: स्त्रियांचे हक्क, त्यांचे अधिकार, जागतिक महिला दिन याची चर्चा नेहमीच करतो, आज थोडं नवऱ्याचं कौतूक करून पाहूया... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2024 03:41 PM2024-04-21T15:41:55+5:302024-04-21T15:42:52+5:30

Husband Appreciation Day: स्त्रियांचे हक्क, त्यांचे अधिकार, जागतिक महिला दिन याची चर्चा नेहमीच करतो, आज थोडं नवऱ्याचं कौतूक करून पाहूया... 

Husband Appreciation Day 2024, why to celebrate world husband day, world husband day 2024 | नवऱ्याचे कौतुक करण्याचा आणि त्याला धन्यवाद म्हणण्याचा खास दिवस, जगभर साजरा झाला कारण...

नवऱ्याचे कौतुक करण्याचा आणि त्याला धन्यवाद म्हणण्याचा खास दिवस, जगभर साजरा झाला कारण...

Highlightsतुमचा आणि तुमच्या कुटूंबाचा भक्कम आधार असणाऱ्या नवरोबाला आजच्या दिवशी थँक यू म्हणूनच टाका. 

तुझं माझं जमेना आणि तुझ्याविना करमेना... अशी नात्यातली गंमत नवरा- बायकोच्या नात्यात हमखास पाहायला मिळतेच. वेळप्रसंगी एकमेकांवर डाफरतील, चिडतील, ओरडतील, अबोला धरतील.... पण शेवटी तेच दोघं तर एकमेकांना खरी साथ देत असतात. तिची धडपड, तिचं काम करणं, तिचं करिअर करणं, तिचं मुलांना सांभाळणं, स्वयंपाक करणं हे सगळ्यांना दिसतं. सगळे तिचं त्यासाठी मुक्तपणे कौतूकही करतात. पण त्याचं बिचाऱ्याचं रोज रोज झुरणं, घरासाठी- मुलांसाठी- बायकोसाठी कष्ट घेणं, आर्थिक गणितांची जुळवाजुळव करून घरातल्या सगळ्यांच्या अपेक्षा पुर्ण करणं याचं मात्र कौतूक खूपच कमी वेळा होतं. कारण त्याच्या या कामांकडे कायम जबाबदारीच्या चष्म्यातूनच पाहिलं जातं... म्हणूनच आता हा चष्मा थोडासा काढूया आणि आजच्या जागतिक नवरा दिनी किंवा Husband Appreciation Day च्या दिवशी त्याचं मनापासून कौतूक करत त्याला थँक यू म्हणूया... (world husband day 2024)

 

एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जगभरात Husband Appreciation Day साजरा केला जातो. हाच दिवस world husband day म्हणूनही ओळखला जातो. जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतातच. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे नवरेही पाहायला मिळतात.

नवऱ्यासोबत असतानाही आमिर खानच्या लेकीला छळतोय एकटेपणा, इरा म्हणाली खूप भीती वाटते कारण.....

जसे बायकोवर कायम अन्याय, अत्याचार करणारे नवरे आपण बघतो, तसेच चांगले नवरेही असतातच की. पण जसं खड्यासोबत गहू भरडले जातात, तसंच चांगल्या नवऱ्यांचही होतं. त्यांनी काळजीपोटी, प्रेमापोटी केलेल्या काही गोष्टींना उगाच पुरुषप्रधान संस्कृतीचं लेबल लावलं जातं. शिवाय दरवेळी नात्यामध्ये बायकोवरच अन्याय, अत्याचार होतात असंही नाही. 

 

याचीच जाणीव सगळ्यांना आणि विशेषत: बायकोला व्हावी आणि तिनेही प्रत्येक गोष्टीत तिच्या नवऱ्याला गृहित धरणं सोडावं यासाठी जागतिक स्तरावर Husband Appreciation Day साजरा केला जातो. कारण एखादी स्त्री खंबीरपणे तेव्हाच काम करु शकते, जेव्हा तिचा नवरा, तिचं कुटूंब तिला साथ देतं.

उष्णतेमुळे तळपायाला खूपच भेगा पडल्या? ४ घरगुती पदार्थ एकत्र करून पायावर चोळा, भेगा जातील

आज कर्तबगार महिलांची संख्या वाढते आहे. यावरुनच घराघरात महिलांना मिळणारा आधार,त्यांना मिळणारं प्रोत्साहन दिवसेंदिवस वाढते आहे हे लक्षात येतं. पण त्यासाठी कुणी काही त्यांचा सत्कार करत नाही किंवा त्यांना मनापासून धन्यवादही म्हणत नाही. पुन्हा तेच त्यांचं कर्तव्यच आहे, म्हणून त्यांच्या सोबतीकडे पाहिलं जातं. म्हणूनच तर तुमचा आणि तुमच्या कुटूंबाचा भक्कम आधार असणाऱ्या नवरोबाला आजच्या दिवशी थँक यू म्हणूनच टाका. 

 

Web Title: Husband Appreciation Day 2024, why to celebrate world husband day, world husband day 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.